जोधपूर न्यायालयाने अधिवक्ता खुश खंडेलवाल यांची याचिका स्वीकारली !

‘आश्रम’ वेब सिरीजचे निर्माते प्रकाश झा आणि अभिनेते बॉबी देओल यांच्याविरुद्धच्या याचिकेचे प्रकरण

मुंबई – वर्ष २०२० मध्ये प्रसारित झालेल्या ‘आश्रम’ या वेब सिरीजचे निर्माते प्रकाश झा आणि अभिनेते बॉबी देओल यांच्याविरुद्ध अधिवक्ता खुश खंडेलवाल यांनी प्रविष्ट केलेली याचिका जोधपूर मेट्रोच्या जिल्हा आणि सत्र न्यायालयाने स्वीकारली आहे. अधिवक्ता खांडेलवाल यांनी गेल्या ३ वर्षांपासून त्यांनी याविषयी न्यायालयीन लढा दिला.

अधिवक्ता खुश खंडेलवाल यांनी केलेल्या तक्रारी आणि दिलेला न्यायालयीन लढा !

१. ‘आश्रम’ या ‘वेब सीरिज’च्या माध्यमातून हिंदु साधू-संतांचे केलेले अवमानकारक चित्रण आणि केलेली हिंदु धर्माची अपकीर्ती, यांप्रकरणी २२ ऑगस्ट २०२० या दिवशी प्रकाश झा अन् बॉबी देओल यांच्या विरोधात प्रथम दर्शनी अहवाल नोंदवण्यासाठी अधिवक्ता खांडेलवाल यांनी राजस्थानमधील जोधपूर येथील कुडी भगतासनी पोलीस ठाण्यात तक्रार केली होती.

२. कुडी पोलिसांनी या प्रकरणी कोणतीही कारवाई न केल्याने अधिवक्ता खंडेलवाल यांनी जोधपूरमधील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकार्‍यांकडे तक्रार प्रविष्ट करून या दोघांविरुद्ध एफ्.आय.आर्. नोंदवण्याची विनंती केली होती. १७ नोव्हेंबर २०२० या दिवशी न्यायदंडाधिकार्‍यांनी कोणतेही न्याय्य कारण न देता ती विनंती नाकारली.

प्रकाश झा आणि अभिनेते बॉबी देओल

३. यावर अधिवक्ता खंडेलवाल यांनी जिल्हा आणि सत्र न्यायालयात फौजदारी याचिका प्रविष्ट करून न्यायदंडाधिकार्‍यांच्या आदेशाला आव्हान दिले. त्यात जिल्हा आणि सत्र न्यायालयाने प्रारंभी प्रकाश झा आणि बॉबी देओल यांना नोटीस बजावली होती.

४. त्यानंतर जिल्हा न्यायालयाने दोन्ही पक्षांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर खंडेलवाल यांची याचिका स्वीकारत खंडेलवाल यांच्या दोघांविरुद्ध एफ्.आय.आर्. नोंदवण्याच्या मागणीवर फेरविचार करण्याचे निर्देश न्यायदंडाधिकारी न्यायालयाला दिले आहेत.

सनातन प्रभात:

‘आश्रम’ वेब सिरीजवरून अभिनेते बॉबी देओल आणि निर्माते प्रकाश झा यांना न्यायालयाची नोटीस