मुख्‍यमंत्र्यांच्‍या भेटीनंतर ‘के.ई.एम्.’ रुग्‍णालयाच्‍या दुरुस्‍तीच्‍या कामाला १२ घंट्यांत प्रारंभ !

मुंबई – मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे यांनी २१ ऑगस्‍टच्‍या मध्‍यरात्री परळ येथील मुंबई महानगरपालिकेच्‍या ‘के.ई.एम्.’ रुग्‍णालयाला अचानक भेट दिली. या वेळी मुख्‍यमंत्र्यांनी रुग्‍णालयातील ६ विभाग दुरुस्‍त करण्‍याची सूचना केली होती. त्‍यांच्‍या सूचनेनंतर १२ घंट्यांत या सर्व विभागांच्‍या दुरुस्‍तीच्‍या कामाला प्रारंभ करण्‍यात आला आहे. या कामामध्‍ये स्‍थापत्‍य, विद्युत्, नवीन फर्निचर आणि वैद्यकीय प्राणवायू वाहिनी (मेडिकल ऑक्‍सिजन पाईपलाईन) यांसारखी कामे हाती घेण्‍यात आली आहेत.