‘व्‍हेगन डाएट’विषयी वेळीच सावध होणे महत्त्वाचे !

‘व्‍हेगन डाएट म्‍हणजे प्राणिज अन्‍नपदार्थांचा संपूर्ण त्‍याग.’ ही आहारशैली पाळणारे लोक दूध, तूप, मध हे पदार्थही खाण्‍यास वर्ज्‍य मानतात. हे पदार्थ मिळवतांना हिंसा होते, असा त्‍यांचा सिद्धांत.

श्री गुरूंप्रती अपार भाव आणि गुरुसेवेची तीव्र तळमळ यांच्‍या बळावर वय अन् शारीरिक त्रास यांच्‍या मर्यादा ओलांडून झोकून देऊन गुरुसेवा करणार्‍या ६९ टक्‍के आध्‍यात्मिक पातळीच्‍या सौ. नम्रता शास्‍त्री (वय ७१ वर्षे) !

वर्ष २००१ मध्‍ये नागपूर येथे सनातनचा सत्‍संग चालू झाला. तेव्‍हापासून सौ. नम्रता शास्‍त्री सत्‍संगाला येऊ लागल्‍या. त्‍यांनी लगेचच सत्‍सेवा करण्‍यास आरंभ केला. त्‍या मोठ्या पदावर नोकरीला होत्‍या.

‘व्‍यष्‍टी आणि समष्‍टी साधना करतांना साधकाने तारतम्‍य कसे ठेवावे ?’, याविषयी परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांनी केलेले मार्गदर्शन !

‘एकदा एका सत्‍संगात परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांना दोन जिज्ञासूंनी व्‍यष्‍टी आणि समष्‍टी साधनेविषयी काही वैशिष्‍ट्यपूर्ण प्रश्‍न विचारले. तेव्‍हा परात्‍पर गुरु डॉक्‍टरांनी त्‍यांच्‍या त्‍या प्रश्‍नांची उत्तरे दिली.

‘कर्तेपणामुळे साधनेची घसरण होते आणि कृतज्ञतेमुळे साधनेत प्रगती होते’, असे शिकवणारे सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !

‘कर्तेपणा’ म्‍हणजे ‘एखादी कृती किंवा विचार स्‍वतः केला आहे’, असे वाटणे आणि तसे इतरांना दाखवण्‍याचा प्रयत्न करणे. हे म्‍हणजे स्‍वत:च स्‍वत:ला प्रशस्‍तीपत्रक देण्‍यासारखे आहे.

विदेशांत फिरायला गेल्‍यावर तेथील महिलांविषयी लक्षात आलेली सूत्रे आणि त्‍यातून जाणवलेली भारतीय संस्‍कृतीची महानता !

२३.५.२०२३ या दिवशी मी माझ्‍या मुलासह विदेशांत फिरायला गेले होते. प्रथम आम्‍ही स्‍वित्‍झर्लंड येथे गेलो होतो. तेथील झर्मेट या ठिकाणी आम्‍ही रात्री भोजनासाठी उपाहारगृहात गेलो होतो.

सद़्‍गुरु अनुराधा वाडेकर यांची भेट झाल्‍यावर प्रसन्‍न आणि आनंदी होणार्‍या ६७ टक्‍के आध्‍यात्मिक पातळीच्‍या ठाणे येथील सौ. नम्रता ठाकूर (वय ६२ वर्षे) !

आम्‍ही सौ. नम्रताला भेटलो, तेव्‍हा ती झोपून होती. तिला फारसे अन्‍न जात नव्‍हते. त्‍यामुळे तिला पुष्‍कळ अशक्‍तपणा आला होता. ती केवळ प.पू. गुरुदेव आणि सद़्‍गुरु अनुराधाताई (सद़्‍गुरु अनुराधा वाडेकर) यांचेच नाव घेत होती.

प्रेमभाव आणि स्‍वयंशिस्‍त या गुणांचा संगम असलेले सनातनचे ४६ वे (समष्‍टी) संत पू. भगवंत कुमार मेनराय (वय ८५ वर्षे) !

‘श्रावण शुक्‍ल पंचमी (२१.८.२०२३) या दिवशी सनातनचे ४६ वे (समष्‍टी) संत पू. भगवंत कुमार मेनराय यांचा ८५ वा वाढदिवस झाला. त्‍यानिमित्त त्‍यांची सेवा करतांना मला शिकायला मिळालेली सूत्रे आणि आलेल्‍या अनुभूती पुढे दिल्‍या आहे.

‘कोरोना’ विषाणूंमुळे निर्माण झालेल्‍या आपत्‍काळात आध्‍यात्मिक बळ वाढवण्‍यासाठी गुरुदेवांनी सांगितलेला ‘दुर्गा-दत्त-शीव’ यांचा नामजप करतांना आलेल्‍या अनुभूती

‘२८.६.२०२१ या दिवशी सायंकाळी मी नेहमीप्रमाणे कोरोना महामारीच्‍या कालावधीत रोगप्रतिकारक्षमता वाढण्‍यासाठी सांगितलेला ‘दुर्गा-दत्त-शीव’ यांचा नामजप करत होतो. मी प्रार्थना केली. त्‍यानंतर ‘परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांचे विराट रूप डोळ्‍यांसमोर आणूया’..

काँग्रेसच्‍या धर्मांध नेत्‍याची धमकी जाणा !

काँग्रेसचे ज्‍येष्‍ठ नेते अझीझ कुरेशी यांनी ‘मुसलमानांवर अत्‍याचार होत असून पाणी डोक्‍यावरून जाईल, तेव्‍हा मुसलमान हातामध्‍ये बांगड्या भरून बसणार नाहीत. २२ कोटींपैकी २ कोटी मुसलमान ठार झाले, तरी अडचण नाही’, असे विधान केले आहे.

नवी मुंबईत शिक्षण विभागाकडून तासिका तत्त्वावर १७८ शिक्षकांची भरती पूर्ण !

महापालिकेच्‍या शिक्षण विभागाच्‍या वतीने मागील मासापासून चालू केलेली शिक्षक भरतीची प्रक्रिया नुकतीच पूर्ण झाली आहे. १८३ पैकी १७८ शिक्षकांची भरती करण्‍यात आली आहे, अशी माहिती शिक्षण विभागाचे उपायुक्‍त दत्तात्रय घनवट यांनी दिली. तासिका तत्त्वावर तात्‍पुरत्‍या स्‍वरूपात या शिक्षकांची नेमणूक करण्‍यात आली आहे.