समाजवादी पक्षाचे खासदार शफीकुर रहमान यांचा दावा
लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – समाजवादी पक्षाचे (सपाचे) खासदार शफीकुर रहमान यांनी एकापेक्षा अधिक विवाह करणे योग्य असल्याचे म्हटले आहे. बहुपत्नीत्व हे इस्लाममध्ये धार्मिक कृत्य आहे. कुराणही एकापेक्षा अधिक लग्न करण्याची अनुमती देते, असा दावा शफीकुर रहमान यांनी केला. आसाममध्ये एकापेक्षा अधिक विवाहांवर बंदी घालण्यासाठी आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा यांनी कायदा आणण्याची सिद्धता चालू केली आहे. या दृष्टीने जनतेकडून या प्रस्तावित कायद्याच्या संदर्भात सूचना मागवण्यात आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर शफीकुर रहमान यांनी हा दावा केला.
सरकारला इस्लाममध्ये हस्तक्षेप करण्याचा अधिकार नाही !सरकारला इस्लामच्या धार्मिक विषयांमध्ये हस्तक्षेप करण्याचा किंवा त्यावर बंदी घालण्याचा अधिकार नाही. एकपत्नीत्वाचा कायदा केला, तर आम्ही त्याला उत्तर देऊ, असे शफीकुर रहमान यांनी म्हटले आहे.आसाम सरकारने प्रसारित केलेल्या नोटिसीनुसार इस्लामच्या संदर्भात न्यायालयाने ‘एकापेक्षा अधिक पत्नी असणे, हा धर्माचा अत्यावश्यक भाग नाही’, असे म्हटले आहे. |
संपादकीय भूमिका
|