भारतीय ग्रँडमास्टर प्रज्ञानंद ‘फिडे विश्‍वचषक बुद्धीबळ स्पर्धे’च्या अंतिम फेरीत !

अंतिम फेरीमध्ये प्रवेश केल्यानंतर प्रज्ञानंद म्हणाला, ‘मला अंतिम फेरीमध्ये पोचण्याची अपेक्षा नव्हती. मी केवळ माझे सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करीन आणि पुढे काय होते ते पाहीन.’

गोरक्षक मोनू मानेसर यांनी चिथावणीखोर वक्तव्य केलेच नाही !

मोनू मानेसर याने सामाजिक माध्यमांवरून एवढेच म्हटले आहे की, ‘मी यात्रेत सहभागी होण्यासाठी येत आहे. आपणही यात सहभागी व्हा.’ हे भडकावणारे वक्तव्य असू शकत नाही.

अंनिसचा ‘अविवेकी’ चेहरा झाकण्यासाठी अविनाश पाटील यांचे सनातनवर बेछूट आरोप ! – सनातन संस्था

न्यायालय खोट्या आरोपांवर नव्हे, तर पुराव्यांच्या आधारे कारवाई करते. न्यायदेवता आणि ‘सत्याचाच विजय होतो’, या धर्मवचनावर सनातन संस्थेची श्रद्धा आहे.

केंद्रशासन महाराष्ट्रातील २ लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करणार !

केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर ४० टक्के शुल्क आकारण्यामुळे कांदा उत्पादक शेतकर्‍यांनी याविषयी अप्रसन्नता व्यक्त केली होती. यामुळे केंद्र सरकारकडून कांदा खरेदीचा निर्णय घेण्यात आला.

महाराष्ट्रातील विविध न्यायालयांत ५२ लाख खटले प्रलंबित !

३१३ खटले २० वर्षांहून अधिक काळ प्रलंबित आहेत. न्याय मिळण्याची प्रकिया लवकरात लवकर पूर्ण व्हावी, यासाठी सरकारने युद्धपातळीवर प्रयत्न करणे अपेक्षित !

मंत्री विजयकुमार गावित यांना महिला आयोगाची नोटीस !

विजयकुमार गावित यांनी ‘‘मासे खाल्ल्यावर बाईमाणूस चिकनी दिसायला लागते. डोळेपण तरतरीत दिसतात. आपली त्वचाही चांगली दिसते. त्यात एक प्रकारचे तेल असते’’, असेही वादग्रस्त विधान केले

‘लुना-२५’ यानाच्या अपयशामुळे रशियाचे शास्त्रज्ञ आजारी : रुग्णालयात भरती !

रशियाने चंद्रावर पाठलेले ‘लुना-२५’ हे यान चंद्राच्या पृष्ठभागावर कोसळले. ही घटना स्वीकारता न आल्याने रशियाचे ९० वर्षीय शास्त्रज्ञ मिखाईल मारोव यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना रुग्णालयात भरती करावे लागले.

आसाममध्ये बहुपत्नीत्वावर बंदी आणण्याच्या सिद्धतेत आहेत मुख्यमंत्री सरमा !

आज बहुपत्नीत्वामुळे देशाच्या साधनसंपत्तीवर जो अतिरिक्त भार पडत आहे, त्यामागे ‘हम पाच हमारे पच्चीस’ची मानसिकता असणारेच प्रामुख्याने कारणीभूत आहेत, हे सत्य कुणीच नाकारणार नाही !

जपान फुकुशिमा अणूऊर्जा प्रकल्पातील पाणी समुद्रात सोडणार : चीन-दक्षिण कोरियाचा विरोध

जपान त्याच्या निकामी झालेल्या फुकुशिमा अणूऊर्जा प्रकल्पातील १३३ कोटी लिटर पाणी २४ ऑगस्टपासून प्रशांत महासागरात सोडणार आहे.

बिहारच्या मुख्यमंत्र्यांच्या वाहन ताफ्यासाठी अडवण्यात आली रुग्णवाहिका !

रुग्णवाहिकेत होता प्रकृती चिंताजनक असलेला रुग्ण !
नातेवाइकांनी पोलिसांना केलेली विनवणी व्यर्थ !