मुंबई – केंद्रशासन महाराष्ट्रातील २ लाख मेट्रिक टन कांदा प्रती क्विंटल २ सहस्र ४१० रुपये या दराने खरेदी करणार आहे. यासाठी नाशिक आणि अहिल्यानगर येथे खरेदी केंद्रे चालू करण्यात येणार आहेत, अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीटद्वारे दिली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्याशी चर्चा करून हा निर्णय घेण्यात आला आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
केंद्र सरकार 2410 रुपये प्रति क्विंटल या ऐतिहासिक दरानं 2 लाख मेट्रीक टन कांदा खरेदी करणार, या निर्णयाबद्दल कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी केंद्र सरकारचे मानले आभार pic.twitter.com/oYHiJkYJDf
— Rokhthok Maharashtra News (@RokhthokNews) August 22, 2023
राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी कांद्याच्या खरेदीच्या प्रश्नावर गोयल यांच्याशी चर्चा केली. या चर्चेनंतर वरील तोडगा काढण्यात आला. केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर ४० टक्के शुल्क आकारण्यामुळे कांदा उत्पादक शेतकर्यांनी याविषयी अप्रसन्नता व्यक्त केली होती. यामुळे केंद्र सरकारकडून कांदा खरेदीचा निर्णय घेण्यात आला.