|
पाटलीपुत्र (बिहार) – येथील महामार्गावरून २१ ऑगस्ट या दिवशी मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या वाहनांचा ताफा जात असल्याने पोलिसांनी सुरक्षेच्या निमित्ताने अन्य वाहतूक रोखली होती. यात एका रुग्णवाहिकेचाही समावेश होता. यात एक रुग्ण चिंताजनक स्थितीत होता. मुख्यमंत्र्यांच्या ताफा निघून गेल्यानंतर पोलिसांनी वाहतूक पूर्ववत् केली. त्यानंतर ही रुग्णवाहिका पुढे जाऊ शकली. वाहतूक रोखून धरली असतांना रुग्णवाहिकेतील रुग्णाच्या नातेवाइकांनी पोलिसांना अनेकदा विनवणी करूनही त्यांनी रुग्णवाहिकेला रुग्णालयात जाऊ दिले नाही. या संदर्भातील व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाला आहे. या प्रकरणी भाजपने मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर टीका केली आहे.
प्रधानमंत्री बनने का सपना देख रहे नीतीश कुमार की संवेदनहीनता देखिए। उनके क़ाफ़िले की रफ़्तार कम ना पड़े, इसके लिए वो किसी की जान दांव पर लगा सकते हैं। एक तरफ़ जहां मोदी जी ने कई दफ़ा ना सिर्फ़ अपने क़ाफ़िले बल्कि रोड शोज़ तक एंबुलेंस को रास्ता देने के लिए रुकवा दिये, नीतीश बाबू… pic.twitter.com/gJjz5Jj9wo
— Amit Malviya (@amitmalviya) August 22, 2023
संपादकीय भूमिकाअशा प्रकारचे असंवेदनशील पोलीस आणि शासनकर्ते जनतेचे रक्षक कि भक्षक ? |