नाशिकमध्‍ये गावगुंडांकडून वाहनांची तोडफोड !

समोर उभ्‍या असणार्‍या पोलिसांना नागरिकांनी गावगुंडांचा पाठलाग करण्‍याची विनंती केली. मात्र गाडीची क्‍लचप्‍लेट खराब असल्‍याची सबब पुढे करत पोलिसांनी उदासीनता दाखवली.

‘इंडिया’ नावाचा वापर करून लोकांची दिशाभूल करता येणार नाही ! – पंतप्रधान

आज जगामध्ये भारताची प्रतिमा सुधारली आहे. वर्ष २०४७ पर्यंत आपण देशाला विकसित देश बनवू. जनतेच्या पाठिंब्याने भाजप वर्ष २०२४ मधील लोकसभेच्या निवडणुकीत पुन्हा सत्तेवर येईल.

भारतीय रेल्‍वेची तिकीट विक्री काही घंटे बंद

आय.आर्.सी.टी.सी. (इंडियन रेल्‍वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन) चे ‘अ‍ॅप’ आणि संकेतस्‍थळ बंद पडले होते. त्‍यामुळे तिकीट काढणार्‍या प्रवाशांची गैरसोय झाली.

(म्हणे) ‘संरक्षणाचा सौदा करणार्‍यांसाठी देश पहिला कि वासना ?’ – असदुद्दीन ओवैसी

भारताच्या संरक्षणाला सुरुंग लावणार्‍यांच्या विरोधात भारत सरकार कटीबद्धच आहे ! मुसलमानांसाठी देश पहिला आहे कि नाही ? यावर ओवैसी पळपुटी भूमिका घेतात, हे मात्र खरे !

(म्हणे) ‘गजमुख असलेला भगवान श्री गणेश ही केवळ एक दंतकथा !’-ए.एन्. शमसीर यांची गरळओक

भारतीय राज्यघटना ही धर्मनिरपेक्ष आहे. असे असतांना राज्यघटनेने दिलेल्या एका महत्त्वाच्या पदावर राहून हिंदु समाजाच्या धार्मिक भावना दुखावण्याचा अधिकार शमसीर यांना कुणी दिला ?

(म्हणे) ‘पाकने भीक मागणे बंद करावे !’ – पाकचे सैन्यप्रमुख

पाकिस्तानचे आर्थिक दिवाळे निघाले आहे. त्यामुळे पाकच्या सैन्यप्रमुखांनी अशी कितीही वक्तव्ये केली, तरी तेथील परिस्थिती पालटणार नाही, हेही तितकेच खरे !

पाकच्या इस्लामिया विद्यापिठातील शेकडो विद्यार्थिनींचे ५ सहस्र ५०० अश्‍लील व्हिडिओ आले समोर !

एजाज शाह याच्या दोन भ्रमणभाषांतून शेकडो मुलींचे ५ सहस्र ५०० अश्‍लील व्हिडिओ प्राप्त झाले असून त्याच्या गाडीतून ‘आइस ड्रग’ नावाचा अमली पदार्थही मोठ्या प्रमाणात हस्तगत करण्यात आला.

लडाख सीमेवर शांतता पुनर्स्थापित होईपर्यंत चीनशी ताणलेले संबंध सामान्य होऊ शकत नाहीत !

चीन आणि पाकिस्तान यांना शब्दांची भाषा समजत नाही , त्यामुळे त्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर देण्याची आवश्यकता आहे. जेव्हा भारत असे करील, तेव्हाच या समस्या दूर होतील !

भारताने चीनच्या इलेक्ट्रिक चारचाकी आस्थापनाच्या गुंतवणुकीला दिला नकार !

बीवायडी हे आस्थापन सध्या तिची २ इलेक्ट्रिक वाहने भारतात विकत आहे, तसेच इलेक्ट्रिक बसच्या संदर्भात भारतातील ओलेक्ट्रा ग्रीनटेक या आस्थापनाला तांत्रिक साहाय्य करत आहे.

श्रीलंकेच्या नौदलाकडून ९ भारतीय मासेमारांना अटक

श्रीलंकेच्या नौदलाने त्याच्या समुद्री क्षेत्रात बेकायदेशीररित्या प्रवेश करून मासेमारी केल्याच्या प्रकरणी ९ भारतीय मासेमारांना अटक केलीे. या वेळी श्रीलंकेच्या नौदलाने या मासेमारांच्या २ नौकाही कह्यात घेतल्या.