‘रुग्‍णसेवा, म्‍हणजे जनता जनार्दनाची सेवा’, असा भाव असलेले रामनाथी आश्रमातील साधक वैद्य आणि आधुनिक वैद्य (डॉक्‍टर) !

आज सनातनचे साधक वैद्य आणि आधुनिक वैद्यही (डॉक्‍टरही) रुग्‍ण साधकांसाठी मोठा आधारस्‍तंभ बनले आहेत. या वैद्यांच्‍या प्रेमभावामुळे अत्‍यल्‍प काळात रुग्‍ण साधकांत उत्‍साह निर्माण होतो. साधक-वैद्यांना भेटल्‍यावर ‘हिंदु राष्‍ट्रातील वैद्यकीय चिकित्‍सा अशीच असेल’, याची मला निश्‍चिती झाली. सच्‍चिदानंद परब्रह्म गुरुदेवांच्‍या पावन चरणी कोटीशः कृतज्ञता !’

सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्‍या ब्रह्मोत्‍सवाच्‍या दिवशी आलेल्‍या अनुभूती 

ब्रह्मोत्‍सवात सहभागी झालेल्‍या साधिकांना नऊवारी साडी नेसवण्‍याची सेवा करतांना तहान-भूक विसरणे आणि ‘साधिका टाळनृत्‍य करत असतांना त्‍यांच्‍या समवेत टाळनृत्‍य करत आहे’, असे वाटणे

एका धर्मप्रेमीने सनातन संस्‍थेचे ग्रंथ अमूल्‍य असल्‍याचे सांगून ग्रंथांच्‍या मूल्‍यापेक्षा अधिक पैसे देणे

मी सोलापूर येथील एका धर्मप्रेमींना स्‍वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन करण्‍याविषयीचे ग्रंथ दिले, तसेच ‘परात्‍पर गुरु डॉ. जयंत आठवले यांचे छायाचित्रमय जीवनदर्शन : भाग ५’ हा ग्रंथ दिला. तेव्‍हा त्‍या धर्मप्रेमींनी ग्रंथांच्‍या अर्पण मूल्‍यांपेक्षा काही पैसे अधिक दिले.