केरळ विधानसभेचे धर्मांध सभापती ए.एन्. शमसीर यांची गरळओक
थिरूवनंतरपूरम् – केरळ विधानसभेचे सभापती ए.एन्. शमसीर यांनी एका कार्यक्रमात ‘गजमुख असलेला भगवान श्री गणेश ही केवळ एक दंतकथा आहे’, असे वक्तव्य केले होते. हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्याच्या प्रकरणी भाजप आणि विहिंप यांनी त्यांच्या विरोधात पोलिसांत तक्रार प्रविष्ट केली आहे. शमसीर यांना सभापदीपदावरून काढून टाकावे, अशी मागणी करणारे निवेदन राज्यपाल आणि राष्ट्रपती यांना देण्यात येणार असल्याचे विश्व हिंदु परिषदेने म्हटले आहे. ‘तर्कशुद्ध विचारांना प्रोत्साहन देण्याच्या नावाखाली सभापतींनी हिंदूंच्या धार्मिक भावनांचा अवमान केला आहे’, असे भारतीय जनता पक्षाच्या थिरूवनंतपूरम् जिल्ह्याचे उपाध्यक्ष आर.एस. राजीव यांनी म्हटले आहे.
हिंदू मान्यताओं और श्री गणेश पर टिप्पणी कर बुरी तरह फंसे केरल के स्पीकर एएन शमसीर, हिंदूवादी संगठनों ने कराया एफआईआर, किया माफी की मांग#Kerala | #ANShamseer | #LordGanesha | #Hinduism https://t.co/bAWF1IHiCe
— Asianetnews Hindi (@AsianetNewsHN) July 25, 2023
‘एर्नाकुलम जिल्ह्यातील सरकारी उच्च माध्यमिक शाळेने आयोजित केलेल्या ‘विद्या ज्योती’ कार्यक्रमात बोलतांना शमसीर यांनी हिंदुविरोधी टिप्पणी केली. शमसीर ही इस्लाम मानणारी व्यक्ती असून त्यांनी जाणीवपूर्वक हिंदूंच्या धार्मिक भावनांचा अवमान केला आहे. त्यांनी धर्मद्वेषी विधान करत विविध धर्मांमध्ये शत्रुत्व निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे’, असे या तक्रारीत म्हटले आहे.
संपादकीय भूमिका
|