(म्हणे) ‘पाकने भीक मागणे बंद करावे !’ – पाकचे सैन्यप्रमुख

प्रतिकात्मक चित्र

इस्लामाबाद – पाकिस्तानने अन्य देशांकडे भीक मागणे बंद करावे, तसेच विदेशी कर्जावर विसंबून रहाणे अल्प करणे आवश्यक आहे, असे विधान पाकचे सैन्यप्रमुख सैय्यद असीम मुनीर यांनी केले. ‘पाकिस्तान एक प्रभावशाली आणि उत्साही राष्ट्र असून त्याने आत्मनिर्भर बनणे आवश्यक आहे. (पाकच्या सैन्यप्रमुखांचे फुकाचे बोल ! पाक हा आतंकवादी आणि धर्मांध लोकांचे माहेरघर आहे. त्यामुळे त्याचा विनाश निश्‍चित आहे ! – संपादक) सुरक्षा आणि अर्थव्यवस्था या नाण्याच्या दोन बाजू आहेत. पाकिस्तानमधील आर्थिक संकट जोपर्यंत नष्ट होत नाही, तोपर्यंत पाकिस्तानी सैन्य स्वस्थ बसणार नाही’, असेही ते म्हणाले.

संपादकीय भूमिका

पाकिस्तानचे आर्थिक दिवाळे निघाले आहे. त्यामुळे पाकच्या सैन्यप्रमुखांनी अशी कितीही वक्तव्ये केली, तरी तेथील परिस्थिती पालटणार नाही, हेही तितकेच खरे !