पक्षाचे नाव आणि पक्षचिन्ह यांसाठी निवडणूक आयोगाकडे दावा !
मुंबई – ‘राष्ट्रवादी काँग्रेस’ नाव आणि पक्षाचे चिन्ह ‘घड्याळ’ यांसाठी दावा करणारे पत्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार यांच्या गटाकडून निवडणूक आयोगाकडे देण्यात आले आहे. या पत्रावर ३० जून हा दिनांक असून हे पत्र ५ जुलै या दिवशी निवडणूक आयोगाला प्राप्त झाले आहे. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून अजित पवार यांच्या नावाचा उल्लेख आहे. या पत्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या ४० आमदारांचा पाठिंबा असल्याचा उल्लेख आहे.
राष्ट्रवादी अध्यक्ष म्हणून शरद पवार यांना हटवत अजित पवारांकडून स्वतःची अध्यक्ष म्हणून नियुक्ती #SharadPawar #AjitPawar #SupriyaSule #NCP #Maharashtrahttps://t.co/CLLLroPjQI pic.twitter.com/M9tnIzTo0P
— ABP माझा (@abpmajhatv) July 5, 2023
शरद पवार गटाकडून ९ जणांचे सदस्यत्व रहित करण्याची मागणी !
राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाकडून जयंत पाटील यांनी मंत्रीपदाची शपथ घेतलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या ९ आमदारांची आमदारकी रहिती करावी, अशी मागणी निवडणूक आयोगाकडे केली आहे. हे पत्र ४ जुलै या दिवशी जयंत पाटील यांनी निवडणूक आयोगाला पाठवले आहे.