जळगाव येथे वाहनावर झाड कोसळल्याने पोलीस अधिकार्‍यासह चालक ठार !

या दुर्घटनेत नाशिक येथील आर्थिक गुन्हे शाखेचे साहाय्यक पोलीस निरीक्षक सुदर्शन दातीर यांच्यासह चालक अजय चौधरी यांचे निधन झाले आहे. ३० जून या दिवशी हा प्रकार घडला. दातीर यांच्या पश्चात पत्नी, ८ मासांचा मुलगा, आई-वडील, भाऊ आणि बहीण असा परिवार आहे.  

गोरक्षकांवरील आक्रमणे, धर्मांतर आणि लव्ह जिहाद यांच्या विरोधात आज मालेगाव येथे हिंदूंचा मोर्चा !

भाजपचे आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली २ जुलै या दिवशी मालेगाव येथे गोरक्षकांवरील आक्रमणे, धर्मांतर, लव्ह जिहादच्या विरोधात ‘हिंदु जनआक्रोश मोर्चा’ काढला जाणार आहे. सकाळी १० वाजता रामसेतू पुलाजवळील श्रीराम मंदिरात महाआरती करून मोर्च्याला प्रारंभ होईल

गोहत्या प्रकरणी कडूस परिसरात (पुणे) जमावबंदीचे आदेश लागू !

आषाढी एकादशीच्या दिवशी म्हणजेच २९ जून या दिवशी येथील अवैध पशूवधगृहावर बजरंग दलाचे कार्यकर्ते, तसेच स्थानिक गुन्हे शाखेच्या साहाय्याने पोलिसांनी धाड टाकली होती. या वेळी दिवसाढवळ्या चालू असलेला गोहत्येचा प्रकार उघडकीस आला.

पाकिस्तानमध्ये १ सहस्र ५५० हून अधिक मंदिरे पाडून त्याजागी बांधल्या गेल्या भव्य इमारती !

भारतात अल्पसंख्यांक मुसलमान असुरक्षित असल्याचा कांगावा करणारी अमेरिका आणि इस्लामी देश पाकिस्तानमधील हिंदूंच्या या दुःस्थितीविषयी गप्प का ? याविषयी भारत सरकार पाकला खडसावणार का ?

जळगाव येथे २ गोवंशियांची कत्तल केल्याप्रकरणी ६ संशयित धर्मांधांना अटक !

शहरातील शिवाजीनगर येथील उस्मानिया पार्क भागात २ गोवंशियांची कत्तल केल्याप्रकरणी ६ संशयित धर्मांधांना पोलिसांनी २९ जूनच्या सकाळी अटक केली. या ठिकाणी कत्तलीसाठी आणलेल्या २७ गोवंशियांची सुटका करून त्यांची पाठवणी बाफना गोशाळेत करण्यात आली आहे.

गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने कोल्हापूर आगारातून जादा गाड्यांचे नियोजन !

३ जुलैला असलेल्या गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने कोल्हापूर आगारातून २ जुलैला अक्कलकोट, गाणगापूर, नाणीज, आदमापूर, नृसिंहवाडी, जोतिबा येथे जाण्यासाठी जादा बसगाड्यांची सोय केली आहे.

इंदूर येथील भक्तवात्सल्याश्रमात २ आणि ३ जुलै या दिवशी श्रीगुरुपौर्णिमा महोत्सवाचे आयोजन !

‘श्रीसद्गुरु अनंतानंद साईश शैक्षणिक एवं पारमार्थिक सेवा ट्रस्ट’च्या वतीने येथील भक्तवात्सल्याश्रमात २ जुलै आणि ३ जुलै २०२३ या दिवशी श्रीगुरुपौर्णिमा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे.

झारखंडमध्ये क्षुल्लक कारणामुळे २ गटांमध्ये दंगल : २० जणांना अटक

इ-बॅटरीच्या चोरीच्या प्रकरणात २ गटांमध्ये मारहाण झाली. त्यानंतर वातावरण निवळले; मात्र २ घंट्यांमध्ये स्थिती पुन्हा बिघडली. एका गटाने स्थानिक नगरसेवकाचा पुतळा जाळला.

डच सरकारकडून पोलिसांना क्रॉस किंवा हिजाब परिधान करण्यावर बंदी !

पोलिसांना धर्म किंवा श्रद्धा यांची जाहीरपणे अभिव्यक्ती करणे आवश्यक नाही. पोलीसदल हे सरकारचे प्रतिनिधित्व करते. त्यांना वेळप्रसंगी बळाचाही वापर करावा लागतो.

सोनीपत (हरियाणा) येथील मुसलमानबहुल खान कॉलनीतील हिंदूंवर होत आहेत अत्याचार !

हिंदूबहुल भागांत मुसलमानांना घर नाकारल्यावर आकाश-पाताळ एक करणारे मुसलमानबहुल भागात हिंदूंवर करण्यात येणार्‍या अत्याचारांविषयी चकार शब्दही काढत नाहीत, हे लक्षात घ्या !