गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने कोल्हापूर आगारातून जादा गाड्यांचे नियोजन !

प्रतिकात्मक चित्र

कोल्हापूर – ३ जुलैला असलेल्या गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने कोल्हापूर आगारातून २ जुलैला अक्कलकोट, गाणगापूर, नाणीज, आदमापूर, नृसिंहवाडी, जोतिबा येथे जाण्यासाठी जादा बसगाड्यांची सोय केली आहे. ३० ते ४० पेक्षा अधिक प्रवासी असल्यास त्यांना अधिक गाड्या उपलब्ध करून देण्यात येतील, याची प्रवासी आणि भाविक यांनी नोंद घ्यावी, असे राज्य परिवहन महामंडळाच्या वरिष्ठ आगार व्यवस्थापकांनी कळवले आहे.