साधनेला आरंभ केल्यावर ईश्वराला जाणून घ्यायची जिज्ञासा असेल, तर प्रथम स्वतःला जाणा !
‘साधनेला आरंभ केला की, कुणालाही ईश्वराला पहायची, त्याला जाणून घ्यायची ओढ लागते; पण आपण स्वतः स्वभावदोष आणि अहंकार यांनी मलीन असतांना आपल्याला शुद्ध आणि पवित्र असा ईश्वर कसा भेटेल ! ईश्वराला जाणून घ्यायचे असेल, तर आधी अंतर्मुख होऊन स्वतःला जाणले पाहिजे.