बीड – शहरातील पेठ बीड भागात २१ जून या दिवशी होत असलेला बालविवाह प्रशासनाने रोखला होता; मात्र या प्रकरणात बालविवाह लावण्याचा प्रयत्न केल्यामुळे नवरदेव, त्याचे आई, वडील, मुलीचे आई, वडील, नातेवाईक आणि वर्हाडी अशा १६२ जणांविरोधात गुन्हा नोंद झाला आहे. या बालविवाहाची माहिती नायब तहसीलदार सुरेंद्र डोके यांना मिळाली होती. त्यांनी महिला आणि बालविकास विभागाला याची माहिती देऊन संबंधित अधिकार्यांच्या साहाय्याने बालविवाह थांबवला होता. (अजूनही बालविवाह चालू आहेत, हे गंभीर आहे. केवळ गुन्हा नोंद करून न थांबता त्यांना कठोर शिक्षा होणे आवश्यक ! – संपादक)