रायगडावर होणार्‍या ३५० व्‍या ‘शिवराज्‍याभिषेक सोहळ्‍या’चे साक्षीदार व्‍हा !

छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवराज्‍याभिषेक सोहळा लोकोत्‍सव व्‍हावा. त्‍याची प्रसिद्धी जगभर व्‍हावी; म्‍हणून वर्ष २००७ मध्‍ये रायगडावर १ सहस्र शिवभक्‍तांनी प्रारंभ केलेला ‘शिवराज्‍याभिषेक’ सोहळ्‍यास अडीच ते तीन लाख शिवभक्‍त प्रत्‍यक्ष उपस्‍थित रहातात.

उल्‍हासनगर येथे राष्‍ट्रवादी काँग्रेसचे जितेंद्र आव्‍हाड यांच्‍या विरोधात गुन्‍हा नोंद !

उल्‍हासनगर येथे राष्‍ट्रवादी काँग्रेसच्‍या पदाधिकार्‍यांच्‍या बैठकीचे २७ मे या दिवशी शहर जिल्‍हाध्‍यक्ष पंचम कलानी यांनी आयोजन केले होते. या बैठकीत जितेंद्र आव्‍हाड यांनी सिंधी समाजाविषयी आक्षेपार्ह विधान केले होते.

वैद्यकीय महाविद्यालयांची बजबजपुरी !

वैद्यकीय महाविद्यालयांची बजबजपुरी रोखण्‍यासाठी कठोर कायदा आणि नियंत्रण अत्‍यावश्‍यक !

अधिकार्‍यांची मनमानी नको !

न्‍यून प्रमाणात पाणीपुरवठा झाल्‍याने सामान्‍यजन आणि शेतकरी यांचे होत असलेले हाल अधिकार्‍यांना दिसत नाहीत का ? अधिकार्‍यांचा केवळ स्‍वतःचा भ्रमणभाष परत मिळावा, एवढाच विचार का झाला ?

शेतकर्‍यांच्‍या मागण्‍यांसाठी किसान सभेचा ठाणे जिल्‍हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

ठाणे आणि पालघर जिल्‍ह्यांतील श्रमिकांचे प्रलंबित प्रश्‍न प्राधान्‍याने सोडवावेत, यासाठी ३१ मे या दिवशी ठाणे जिल्‍हाधिकारी कार्यालयावर ‘अखिल भारतीय किसान सभे’च्‍या वतीने मोर्चा काढण्‍यात आला.

छत्रपती शिवरायांच्‍या राज्‍याभिषेकाच्‍या वार्तेमुळे औरंगजेब २ दिवस अन्‍नपाणी घेऊ न शकणे !

बहादूरखान कोकलताशने देहलीला त्‍याचा बादशहा औरंगजेबाला छत्रपती शिवाजी महाराज यांच्‍या राज्‍याभिषेकाची बातमी कळवली.

शरिराप्रमाणे मनाचेही लसीकरण करा !

नियमबद्ध रहाणे आणि धर्माचरण करणे, हेच आरोग्‍यमय अन् यशस्‍वी जीवन जगण्‍याचे उपाय आहेत; कारण नियमबद्ध राहिल्‍याने आपले शरीर निरोगी रहाते आणि धर्माचरण केल्‍याने आपल्‍या मनाचे आरोग्‍य चांगले रहाते.

छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरा पगड जाती, जात्‍यंतर्गत वैमनस्‍य आणि अहंमन्‍यता यांनी विस्‍कळीत झालेला समाज महाराष्‍ट्र धर्माकरता कोणत्‍या किमयेने एकसंधतेने बांधून ठेवला ?

तुम्‍ही ‘देवधर्मरक्षक’, ‘गोब्राह्मणप्रतिपालक’ इत्‍यादी ब्रीदे निर्भयपणाने आणि नि:संदिग्‍धपणाने मिरवूनही विभागणी का झाली नाही ? महाराष्‍ट्र धर्माकरता सहस्रोेंनी मनात किल्‍मिष आणि वैषम्‍य न बाळगता बलीदान का केले ?

शिवराज्‍याभिषेकाचा खर्च मोगलांकडून वसूल !

६ जून १६७४ या दिवशी शिवराज्‍याभिषेक पार पडला. एकूण साधारण १ कोटी रुपये खर्च (तेव्‍हा होन ही मुद्रा होती.) या अद्वितीय सोहळ्‍यासाठी आला. हा खर्च छत्रपती शिवाजी महाराज यांनी मोगलांकडून कसा वसूल केला ? त्‍याचा प्रसंग आणि गनिमी काव्‍याचे उत्‍कृष्‍ट उदाहरण पाहूया. नगर जिल्‍ह्यात पेडगाव नावाचे गाव आहे. तिथे बहादूरखान कोकलताश नावाचा औरंगजेबाचा सुभेदार होता. … Read more

शिवराज्‍याभिषेक : छत्रपती शिवरायांच्‍या हिंदवी साम्राज्‍याचे प्रमुख ध्‍येय !

छत्रपती शिवरायांनी हिंदवी स्‍वराज्‍य स्‍थापनेच्‍या चळवळीचा आरंभ केला. समर्थ रामदासस्‍वामी आणि छत्रपती शिवराय यांनी त्‍यांच्‍या नंतरच्‍या पिढ्यांना संस्‍मरणीय पराक्रम करण्‍याची स्‍फूर्ती दिली.