शेतकर्‍यांच्‍या मागण्‍यांसाठी किसान सभेचा ठाणे जिल्‍हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

ठाणे जिल्‍हाधिकारी कार्यालयावर ‘अखिल भारतीय किसान सभे’च्‍या वतीने मोर्चा काढण्‍यात आला

ठाणे, १ जून (वार्ता.) – शेतकर्‍यांच्‍या विविध मागण्‍या किसान सभेच्‍या वतीने करण्‍यात आल्‍या आहेत. ठाणे आणि पालघर जिल्‍ह्यांतील श्रमिकांचे प्रलंबित प्रश्‍न प्राधान्‍याने सोडवावेत, यासाठी ३१ मे या दिवशी ठाणे जिल्‍हाधिकारी कार्यालयावर ‘अखिल भारतीय किसान सभे’च्‍या वतीने मोर्चा काढण्‍यात आला. या मोर्च्‍यात मोठ्या प्रमाणात जिल्‍ह्यातील शेतकरी, आदिवासी, श्रमिक सहभागी झाले होते.

या सर्वांचे विविध प्रश्‍न अधिकाधिक गंभीर होत चालले आहेत. हे प्रश्‍न सुटावेत, यासाठी यापूर्वीही अखिल भारतीय किसान सभेच्‍या महाराष्‍ट्र राज्‍य कमिटीच्‍या नेतृत्‍वाखालील ‘लाँग मार्च’ काढण्‍यात आला होता.

मोर्च्‍यात करण्‍यात आलेल्‍या मागण्‍या

१. ज्‍येष्‍ठ नागरिकांचा जबाब आणि ग्रामस्‍थांचे म्‍हणणे या पुराव्‍यांच्‍या आधारे आदिवासी अन् वननिवासी यांना न्‍याय द्या.

२. वन अधिकार कायद्याला अभिप्रेत असल्‍याप्रमाणे भौतिक परिस्‍थितीचा वस्‍तूनिष्‍ठ पंचनामा करावा.

३. पेस कायद्याची प्रभावीपणे कार्यवाही करा.

४. मनरेगा योजनेची ठाणे जिल्‍ह्यात प्रभावी कार्यवाही करून मागेल त्‍याला काम, रस्‍ता आणि वेळेवर वाढीव मोबदला द्या.

५. जिल्‍ह्यातील प्रत्‍येक तलाठी कार्यालयात सरकारी भात खरेदी केंद्र चालू करावे.

६. भात, वरई, नागली, सवा आदी आदिवासी शेतकर्‍यांच्‍या पिकांना संरक्षण द्यावे.

संपादकीय भूमिका

असे मोर्चे काढण्‍याची वेळच का येते ?