उल्‍हासनगर येथे राष्‍ट्रवादी काँग्रेसचे जितेंद्र आव्‍हाड यांच्‍या विरोधात गुन्‍हा नोंद !

सिंधी समाजाविषयी आक्षेपार्ह वक्‍तव्‍याचे प्रकरण

जितेंद्र आव्‍हाड

ठाणे, १ जून (वार्ता.) – उल्‍हासनगर येथे राष्‍ट्रवादी काँग्रेसच्‍या पदाधिकार्‍यांच्‍या बैठकीचे २७ मे या दिवशी शहर जिल्‍हाध्‍यक्ष पंचम कलानी यांनी आयोजन केले होते. या बैठकीत जितेंद्र आव्‍हाड यांनी सिंधी समाजाविषयी आक्षेपार्ह विधान केले होते. या प्रकरणी त्‍यांच्‍या विरोधात गुन्‍हा नोंद करण्‍यात आला आहे. गुन्‍हा नोंद होण्‍यासाठी ३१ मे या दिवशी शिवसेनेने, तर १ जूनला भाजपच्‍या वतीने आंदोलन केले होते.