छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरा पगड जाती, जात्‍यंतर्गत वैमनस्‍य आणि अहंमन्‍यता यांनी विस्‍कळीत झालेला समाज महाराष्‍ट्र धर्माकरता कोणत्‍या किमयेने एकसंधतेने बांधून ठेवला ?

छत्रपती शिवरायांची सर्व समाज एकसंध ठेवण्‍याची किमया आम्‍हाला केव्‍हा जमणार ?

‘नरपते शिवाजी महाराज, तुमच्‍या काळात हिंदुसमाज अठरा पगड जाती आणि जात्‍यंतर्गत वैमनस्‍य अन् अहंमन्‍यता यांनी विस्‍कळीत झाला असूनही कोणत्‍या किमयेने तो तुम्‍ही बांधून ठेवला, याचे रहस्‍य कृपाळूपणाने पुन्‍हा एकदा सांगा ना ! मराठा, ब्राह्मण, कायस्‍थ इत्‍यादींप्रमाणेच मावळे, शेतकरी, हेटकरी, मजूर, रामोशी आणि भिल्ल यांच्‍या टोळ्‍या, तसेच महार-मांग इत्‍यादी अस्‍पृश्‍य समाज यांची एकसंध मूठ आपण कोणत्‍या जादूने बांधली होती ? तुम्‍ही ‘देवधर्मरक्षक’, ‘गोब्राह्मणप्रतिपालक’ इत्‍यादी ब्रीदे निर्भयपणाने आणि नि:संदिग्‍धपणाने मिरवूनही विभागणी का झाली नाही ? महाराष्‍ट्र धर्माकरता सहस्रोेंनी मनात किल्‍मिष आणि वैषम्‍य न बाळगता बलीदान का केले ? देह ओवाळून का टाकले ? ते कशाने मोहून गेले होते ?’

– हरिहर पुनर्वसु (‘प्रज्ञालोक’, मे १९९५)