‘लव्‍ह जिहाद’ चे भीषण वास्‍तव उघड करणारा ‘द केरल स्‍टोरी’ चित्रपट आज प्रदर्शित होणार !

केरळमधील लव्‍ह जिहादचे भीषण वास्‍तव उघड करणारा ‘द केरल स्‍टोरी’ हा चित्रपट ५ मे या दिवशी भारतातील सर्व राज्‍यांत प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटावर काहींनी आक्षेप घेतला होता. सर्वोच्‍च न्‍यायालयात या चित्रपटाच्‍या विरोधात याचिकाही प्रविष्‍ट करण्‍यात आली होती.

गोवा येथे शांघाय सहकार्य परिषदेला प्रारंभ

२ दिवसीय परिषदेत अनेक देशांचे परराष्ट्रमंत्री सहभागी झाले आहेत. पहिल्या दिवशी भारताचे परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर यांनी चीन आणि रशिया यांच्या परराष्ट्रमंत्र्यांशी द्विपक्षीय चर्चा केली.

६ मे या दिवशी बारसू येथे प्रकल्‍पग्रस्‍तांची भेट घेणार ! – उद्धव ठाकरे

प्रकल्‍प करण्‍यापूर्वी स्‍थानिकांपुढे प्रकल्‍पाच्‍या आराखड्याचे सादरीकरण व्‍हायला हवे. बळजोरीने प्रकल्‍पाची उभारणी करण्‍यात येऊ नये. ६ मे या दिवशी बारसू येथे जाऊन प्रकल्‍पग्रस्‍तांची घेट घेणार आहे, अशी घोषणा उद्धव ठाकरे यांनी ४ मे या दिवशी पत्रकार परिषदेत केली.

कार्यकर्त्यांच्या भावनांकडे दुर्लक्ष करणार नाही ! – शरद पवार

जो निर्णय मी घेतला आहे, तो पक्षाच्या भवितव्यासाठी आहे. तरीही यावर पुनर्विचार करून मी दोन दिवसानंतर निर्णय घेईन.

राज्यातील सर्व शाळा इंटरनेटद्वारे जोडणार ! – शिक्षणमंत्री दीपक केसरकर

राज्यातील सर्व शाळा इंटरनेटद्वारे जोडण्यासाठी शासनाकडून प्रयत्न चालू आहेत. या दृष्टीने दुर्गम भागांतील ज्या शाळांमध्ये ‘नेटवर्क’ नाही, अशा शाळांची शिक्षण विभागाकडून माहिती मागवण्यात येत आहे.

पिलीभीत (उत्तरप्रदेश) येथे रोहित उपाख्य इमरान या पोलीस कर्मचार्‍याने केला लव्ह जिहाद !

आता मुसलमान पोलीसच लव्ह जिहाद करू लागले आहेत, यावरून धर्मांध मुसलमानांची मजल कुठपर्यंत गेली आहे, हे लक्षात येते !

बिहारमध्ये जातीनिहाय जनगणना करण्यावर उच्च न्यायालयाकडून स्थगिती

बिहार राज्यात जातीनिहाय जनगणना करण्यावर पाटलीपुत्र उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. यावर ३ जुलै या दिवशी पुढील सुनावणी होणार आहे.

रत्नागिरीत उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात चालू झाली विनामूल्य ‘वाय फाय’ सुविधा

राज्याचा परिवहन विभागाच्या सुमारे ५८ सेवा ‘सारथी’ प्रणालीवर ऑनलाईन पद्धतीने करण्यात आल्या आहेत. त्यामुळे नागरिकांचा वेळ आणि पैसा याची बचत होत असून, कार्यालयात मारावे लागणारे हेलपाटे आता वाचले आहेत.

लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) येथे शाळकरी मुलीची छेड काढणार्‍या शहादत अली या पोलिसावर कारवाई !

कुंपणानेच शेत खाण्याचा हा प्रकार आहे ! उत्तरप्रदेश पोलिसांचे नाव खराब करणार्‍या अशा वासनांध मुसलमानांवर कठोर कारवाई व्हायला हवी !

तिवरे (चिपळूण) येथील धरणफुटीला मृद आणि जलसंधारण विभागच उत्तरदायी ! – चौकशी समितीचा अहवाल

तिवरे धरणफुटीमुळे २२ जणांचा बळी गेला होता आणि ५४ कुटुंबे उद्ध्वस्त झाली होती. या धरणफुटीला मृद आणि जलसंधारण विभागच उत्तरदायी आहे. (उत्तरदायी प्रशासकीय अधिकार्‍यांवर कठोर कारवाई हवी !)