बिहारमध्ये जातीनिहाय जनगणना करण्यावर उच्च न्यायालयाकडून स्थगिती

प्रतिकात्मक छायाचित्र

पाटलीपुत्र (बिहार) – बिहार राज्यात जातीनिहाय जनगणना करण्यावर पाटलीपुत्र उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. यावर ३ जुलै या दिवशी पुढील सुनावणी होणार आहे. तोपर्यंत या संदर्भात कोणताही अहवाल बनवण्यात येऊ नये, असेही न्यायालयाने म्हटले आहे.

सुनावणीच्या वेळी मुख्य न्यायाधिशांनी महाधिवक्तत्यांना विचारले, ‘जर सरकारला अशा प्रकारची जनगणना करायची होती, तर त्याविषयी कायदा का संमत केला नाही ?’ त्यावर महाधिवक्ता म्हणाले की, राज्यपालांच्या अभिभाषणाविषयी सर्व स्पष्ट करण्यात आले होते. त्यात कोणत्या आधारे जनगणना करण्यात येईल, हे सांगण्यात आले होते. याचा उद्देश राज्यातील जनतेसाठीच्या योजना बनवणे आणि त्या कार्यवाहीत आणणे, असा आहे.