लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) येथे शाळकरी मुलीची छेड काढणार्‍या शहादत अली या पोलिसावर कारवाई !

प्रतिकात्मक छायाचित्र

लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – येथील एका घटनेचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून मोठ्या प्रमाणात प्रसारित होत आहे. यामध्ये दुचाकीस्वार शहादत अली नावाचा एक पोलीस कर्मचारी सायकलवरून जात असलेल्या एका शाळकरी मुलीची छेड काढत असल्याचे दिसत आहे. त्यांच्या पाठीमागून येणारी एक महिला शहादतला हटकते आणि त्याला बाजूला थांबायला सांगते. संबंधित मुलगी शहादतच्या मुलाच्या वर्गातील असल्याचे तो त्या महिलेला खोटे सांगतो; परंतु त्याने घेतलेले शाळेचे नाव चुकते. यावरून महिला त्या पोलिसावर ‘तो नेहमीच रस्त्यावरून मुलींची छेड काढत असतो’, असा आरोप करतांना दिसत आहे.

याविषयी सामाजिक माध्यमांतून संताप व्यक्त केला जात असून लोकांनी त्याला निलंबित करून अटक करण्याची मागणी केली आहे. पोलिसांनीही या घटनेची नोंद घेतली असून गुन्हा नोंदवत शहादतला कह्यात घेतले आहे. त्याच्या विरोधात निलंबनाची कारवाई करण्यात येईल, असे आश्‍वासनही स्थानिक पोलीस उपाधीक्षकांनी दिले आहे.

संपादकीय भूमिका

  • कुंपणानेच शेत खाण्याचा हा प्रकार आहे ! उत्तरप्रदेश पोलिसांचे नाव खराब करणार्‍या अशा वासनांध मुसलमानांवर कठोर कारवाई व्हायला हवी !