
रत्नागिरी – ऑनलाईन सुविधा देतांना नागरिकांना येणार्या ‘नेटवर्क’ची समस्या लक्षात घेऊन येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात (आर्.टि.ओ.) विनामूल्य ‘वाय फाय’ सुविधा चालू करण्यात आली आहे. महाराष्ट्रदिनापासून ही सुविधा चालू करण्यात आली असून, त्यामुळे नागरिकांची कामेही जलद गतीने होत आहेत.
राज्याचा परिवहन विभागाच्या सुमारे ५८ सेवा ‘सारथी’ प्रणालीवर ऑनलाईन पद्धतीने करण्यात आल्या आहेत. त्यामुळे नागरिकांचा वेळ आणि पैसा याची बचत होत असून, कार्यालयात मारावे लागणारे हेलपाटे आता वाचले आहेत. नागरिकांना घरबसल्या या सेवांचा लाभ घेता येत आहे. त्यामुळे या विभागाचे कामही गतीमान झाले आहे;

मात्र भ्रमणभाषला असलेल्या ‘नेटवर्क’च्या अडचणीमुळे कार्यालयात येणार्या जनतेची गैरसोय होत होती. ही गैरसोय दूर करण्याच्या हेतूने येथील उपप्रादेशिक परिवहन अधिकारी जयंत चव्हाण यांनी कार्यालयात १ मेपासून विनामूल्य वायफाय सुविधा चालू केली आहे. त्यामुळे नागरिकांना या सुविधेमुळे ऑनलाईन सेवा जलद गतीने मिळणार आहेत.
हिंदु राष्ट्र समन्वय समितीच्या मागणीला शिक्षण खात्याचा सकारात्मक प्रतिसाद !
अनुमतीविना म्हादई वन्यजीव अभयारण्यात प्रवेश करणार्या ५ विद्यार्थ्यांविरुद्ध गुन्हा नोंद
शाळांमध्ये अतिरेकी आणि राष्ट्रविरोधी विचारसरणीला थारा नसावा ! – नितीन फळदेसाई
मुंबईत ‘डबेवाले’ बांधवांच्या सन्मानार्थ वैद्यकीय पडताळणी आणि पाद्यपूजा !
‘स्मार्ट मीटर’विषयीच्या अफवांवर विश्वास न ठेवता ग्राहकांनी सहकार्य करावे ! – महावितरणचे आवाहन
भारतात अवैधरित्या वास्तव्यास असलेला अमेरिकेचा माजी सैनिक कह्यात