मुंबई – केरळमधील लव्ह जिहादचे भीषण वास्तव उघड करणारा ‘द केरल स्टोरी’ हा चित्रपट ५ मे या दिवशी भारतातील सर्व राज्यांत प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटावर काहींनी आक्षेप घेतला होता. सर्वोच्च न्यायालयात या चित्रपटाच्या विरोधात याचिकाही प्रविष्ट करण्यात आली होती. हिंदु युवतींचा बुद्धीभेद करून त्यांना इस्लाम धर्म स्वीकारण्यास, तसेच आतंकवादी कारवाया करण्यास कशा प्रकारे भाग पाडण्यात आले, याचे भीषण वास्तव या चित्रपटात मांडण्यात आले आहे. अशा प्रकारे केरळमधील ३२ सहस्र हिंदू आणि ख्रिस्ती युवती बेपत्ता झाल्याचे वास्तव या चित्रपटात दाखवण्यात आले आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या पार्श्वभूमीवर तमिळनाडूमध्ये अतिदक्षतेची चेतावणी देण्यात आली आहे.