उस्मानाबाद जिल्ह्याला ‘धाराशिव’ हे नाव तूर्तास न वापरण्याचा मुंबई उच्च न्यायालयाचा आदेश !

‘महसूल विभाग स्तरावर पालट होईपर्यंत उस्मानाबाद हे नाव पालटणार नाही’, असे आश्वासन राज्य सरकारच्या वतीने महाधिवक्ता बिरेंद्र सराफ यांनी उच्च न्यायालयात दिले आहे.

छत्रपती संभाजीनगर येथे जिवंत व्यक्तीला मृत दाखवत रोखले वेतन !

मृत पावलेल्या इतर कर्मचार्‍याच्या नावाऐवजी त्याच्या नावासमोर चुकीने फुली मारण्यात आली होती. त्यामुळे मृत झाल्याचे समजून त्याचे वेतन रोखण्यात आले होते. 

भाजपचे नेते प्रवीण नेट्टारु यांच्या हत्येच्या प्रकरणी अटकेत असलेला धर्मांध निवडणूक लढवणार !

भारतात प्रत्येकाला निवडणूक लढवण्याचा अधिकार असल्याने याला विरोध करता येणार नाही; मात्र अशा प्रकारचे कायदे पालटण्यासाठी जनतेने सरकारवर दबाव निर्माण करणे आवश्यक आहे !

गुजरात दंगलीतील एका प्रकरणात सर्व ६८ हिंदु आरोपींची निर्दोष मुक्तता !

गुजरातमधील वर्ष २००२ च्या दंगलीच्या प्रकरणी येथील विशेष न्यायालयाने सर्व ६८ आरोपींची निर्दोष मुक्तता केली. निकाल २१ वर्षांनी लागणे, हा न्याय नव्हे ,अन्याय !

भारतासमोर उत्तरसीमा सुरक्षित राखण्याचे आव्हान ! – अमेरिका

अमेरिकेच्या ‘सी-१३०’ या सैन्य सामुग्री घेऊन जाणार्‍या विमानातील महत्त्वपूर्ण भाग हा भारतीय बनावटीचा आहे. या माध्यमातून आम्ही भारताचा सैन्य क्षेत्रातील उद्योग वाढण्यासाठी त्याला साहाय्यही करत आहोत.-एक्विलिनो

जम्मू-काश्मीरमध्ये आतंकवादी आक्रमणात ५ सैनिक वीरगतीला प्राप्त

जिहादी आतंकवाद्यांचे मूळ म्हणजे पाकिस्तानला जोपर्यंत नष्ट केले जात नाही, तोपर्यंत काश्मीरमधील आतंकवाद संपुष्टात येणार नाही, हे सरकारने लक्षात घेणे आवश्यक आहे !

 धक्कादायक : कौटुंबिक जाचातून मुक्त होण्यासाठी महिलांवर ब्लेडद्वारे आक्रमण करण्याचा मौलानाचा सज्जादला सल्ला !

एरव्ही हिंदूंच्या परंपरा या महिलाविरोधी असल्याची बांग ठोकणारे, तसेच हिंदु धर्म अंधश्रद्धा पसरवतो, असा जावईशोध लावणारे आता कोणत्या बिळात जाऊन लपले आहेत ?

अनिल परब यांना २८ एप्रिलपर्यंत न्यायालयाकडून दिलासा !

अनिल परब यांच्यावर मुरुड, दापोली येथील अवैध साई रिसॉर्ट बांधकाम प्रकरणी आर्थिक गैरव्यवहार केल्याचे आरोप करण्यात आले आहेत.

अनुपस्थित राहिलेल्या अधिकार्‍यांवर कारवाई करा ! – माजी उपसभापती चौगुले

मंडणगड तालुका आमसभेस प्रशासनाचे १० खात्यांचे अधिकारी अनुपस्थित राहिल्याने ‘या अधिकार्‍यांच्या विरोधात कडक कारवाई करण्याचा ठराव करावा – दोस्तमहंमद चौगुले.

पेट्रोल पंपावर इंधनासहीत हवा आणि पाणी उपलब्ध करा !

बहुतांशी पर्यटक कुटुंबासह प्रवास करत असल्याने विशेषतः महिलावर्गासाठी योग्य आणि सुरक्षित स्वच्छतागृहे २४ घंटे उपलब्ध होतील, याची दक्षता घ्यावी.