भारतासमोर उत्तरसीमा सुरक्षित राखण्याचे आव्हान ! – अमेरिका

भारताला सर्वतोपरी साहाय्य करत असल्याचे सुतोवाच !

वॉशिंग्टन (अमेरिका) – भारत आणि अमेरिका यांच्यासमोर चीन हे एक समान संरक्षणात्मक आव्हान आहे. भारताला त्याची उत्तर सीमा सुरक्षित करण्यासाठी अमेरिका  त्याला आवश्यक साधनसामुग्री पुरवत आहे, त्यासह त्याचा औद्योगिक विकास करण्याच्या प्रयत्नांत साहाय्यही करत आहे, असे वक्तव्य अमेरिकेचे हिंद-प्रशांत महासागर येथील संरक्षणाचे दायित्व असलेले कमांडर अ‍ॅडमिरल जॉन क्रिस्टोफर एक्विलिनो यांनी केले. भारतासमोर खर्‍या अर्थाने उत्तरी सीमा सुरक्षित करण्याचे आव्हान आहे, असेही एक्विलिनो यांनी या वेळी मान्य केले.

एक्विलिनो पुढे म्हणाले की, अमेरिकेच्या ‘सी-१३०’ या सैन्य सामुग्री घेऊन जाणार्‍या विमानातील महत्त्वपूर्ण भाग हा ‘मेड इन इंडिया’ (भारतीय बनावटीचा) आहे. या माध्यमातून आम्ही भारताचा सैन्य क्षेत्रातील उद्योग वाढण्यासाठी त्याला साहाय्यही करत आहोत.

संपादकीय भूमिका

भारताच्या खांद्यावर बंदूक ठेवून अमेरिका चीनला लक्ष्य करू पहात आहे, हे जाणा !