मंगळुरू (कर्नाटक) – भाजपचे पदाधिकारी प्रवीण नेट्टारू यांच्या हत्येच्या प्रकरणी राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेकडून (एन्.आय.ए.कडून) अटक करण्यात आलेला सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया (एस्.डी.पी.आय.) पक्षाचा नेता शाफी बेळ्ळारे याने पुत्तुरू विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज प्रविष्ट केला आहे. कर्नाटकमध्ये विधानसभेची निवडणूक होत आहे. शाफी याने पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमांतून अर्ज भरला आहे. अर्ज भरण्याच्या वेळी कार्यकर्त्यांकडून मिरवणूक काढण्यात आली होती. तसेच शाफी बेळ्ळारेच्या नावाने घोषणाबाजीही करण्यात आली.
(म्हणे) ‘शाफीच्या अटकेने संतप्त झालेले लोक निवडणुकीद्वारे उत्तर देतील !’ – एस्.डी.पी.आय.चा जिल्हाप्रमुख
पत्रकारांशी बोलतांना एस्.डी.पी.आय.चे जिल्हाप्रमुख अन्वर सादत म्हणाले की, शाफी बेळ्ळारे यांचा आवाज दाबण्यासाठी सरकारने त्यांच्यावर खोटा गुन्हा प्रविष्ट करून त्यांना कारागृहात टाकले आहे. भविष्यात सत्य उघड होईल. शाफी बेळ्ळारे यांच्यावरील खोट्या प्रकरणामुळे लोक संतप्त आहेत. आता ते मतांद्वारे सरकारला उत्तर देणार आहेत.
संपादकीय भूमिका
|