जिल्हा पुरवठा विभागाचे पेट्रोल पंपचालकांना आदेश !
रत्नागिरी – चालू असलेल्या पर्यटनाच्या हंगामात कोकणात येणार्या पर्यटकांची पेट्रोल, डिझेल, सी.एन्.जी. यांविषयी गैरसोय होऊ नये, यासाठी त्याचा पुरेसा साठा ठेवून त्याचा नियमित पुरवठा करावा, तसेच सर्व पंपांवर हवा, पाणी, स्वच्छतागृहे (२४ घंटे चालू ठेवावी) इत्यादी सुविधा विनामूल्य आणि सहज उपलब्ध होतील, याची दक्षता पंपचालकांनीही घ्यावी, असा आदेश जिल्हा पुरवठा विभागाने जिल्ह्यातील सर्व १७ पेट्रोल पंपचालकांना काढले आहेत. पर्यटकांची गैरसोय टाळण्यासाठी हा महत्त्वाचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे.
‘बहुतांशी पर्यटक कुटुंबासह प्रवास करत असल्याने विशेषतः महिलावर्गासाठी योग्य आणि सुरक्षित स्वच्छतागृहे २४ घंटे उपलब्ध होतील, याची दक्षता घ्यावी. इंधन पुरवठा करतांना शासकीय वाहने, अत्यावश्यक सेवेतील वाहने, रुग्णवाहिका यांना प्राधान्य देण्यात यावे’, असेही जिल्हा पुरवठा विभागाने काढलेल्या आदेशात म्हटले आहे.
हवा भरण्यासाठी पैसे घेणार्यांवर कारवाई करा !
जिल्ह्यातील काही पेट्रोलपंपांवर चाकांमध्ये हवा भरण्यासाठी पैसे घेतले जात आहेत, त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी वाहनधारकांकडून केली जात आहे.