कराची (पाकिस्तान) येथील चिनी उद्योगांना पोलिसांनी ठोकले टाळे !

‘जिहादी पाकिस्तान’ आणि ‘चिनी ड्रॅगन’ यांच्या विखारी युतीचे दुष्परिणाम ! यातून दोघांचे एकत्रीकरण भारतासह जगाला किती महाग पडू शकते, हे जागतिक समुदायाने लक्षात घेणे आवश्यक !

बेलारूसमध्ये परमाणु शस्त्रास्त्रे तैनात करण्याच्या रशियाच्या निर्णयाचा ‘जी ७’ देशांकडून निषेध !

अमेरिकेने युरोपमध्ये अनेक ठिकाणी परमाणु शस्त्रास्त्रे तैनात केली आहेत. या तुलनेत रशियाने बेलारूसमध्ये परमाणु शस्त्रास्त्रे तैनात केली, तर हे पाऊल परमाणुविषयीच्या कराराचे उल्लंघन ठरणार नाही-पुतिन

इस्लामवरील टीकाकार गीर्ट विल्डर्स यांना ठार मारा !

पाकिस्तानातील मुफ्ती डॉ. महंमद अश्रफ असिफ जलाली याने मला ठार मारण्याचा फतवा पुन्हा एकदा काढला आहे. त्याने या व्हिडिओद्वारे डच मुसलमानांना मला ठार करण्याची चिथावणी दिली आहे.

अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणार्‍या मनोरुग्णालय शिपायास २० वर्षांचा सश्रम कारावास

अल्पवयीन मुलीवर मनोरुग्णालयात कार्यरत असलेला शिपाई सचिन दिलीप माने याने पीडिता अल्पवयीन आहे, हे ठाऊक असतांनाही पदाचा गैरवापर करून पीडितेशी बळजोरीने शरीरसंबंध ठेवले.

वातावरणातील वाढत्या तापमानामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी !  

उष्माघात होवू नये; म्हणून थोड्या थोड्या वेळाने पाणी प्यावे, सुती कपडे वापरावेत, बाहेर जातांना ‘गॉगल्स’, छत्री किंवा टोपी, बूट वा चप्पलचा वापर करावा, प्रवास करतांना पाण्याची बाटली नेहमी समवेत ठेवावी.

ज्ञानवापीशी संबंधित सर्व ७ प्रकरणांची एकत्रित सुनावणी होणार

ज्ञानवापी आणि शृंंगार गौरी प्रकरणातील ७ याचिकांवर एकत्र सुनावणी करण्याचा न्यायालयाचा आदेश ! शृंगार गौरीच्या प्रकरणी वादी असणार्‍या लक्ष्मी देवी, सीता साहू, मंजू व्यास आणि रेखा पाठक यांनी अर्ज करून ही मागणी केली होती.

हिंदूंच्या मंदिरांवरील आक्रमणांत दुपटीने वाढ !

पाकिस्तान सरकारला घरचा अहेर ! भारतातील अल्पसंख्यांकांवरील कथित अत्याचारांविषयी गळे काढणार्‍या आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटना आता पाकमधील अल्पसंख्य हिंदूंच्या दुःस्थितीविषयी चकार शब्दही काढत नाहीत, हे लक्षात घ्या !

उत्तरप्रदेशात कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती उत्तम ! – मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ

जे माफिया आधी राज्यासाठी संकट होते, आता ते स्वतः संकटात आहेत. आमच्या काळात उत्तरप्रदेशात एकदाही संचारबंदी लागलेली नाही. कोणत्याही रस्त्यावरून जायला आता भीती वाटत नाही. उत्तरप्रदेश आता विकासासाठी ओळखला जातो.

वैद्यकीय पर्यटनात भारत आघाडीवर ! – केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक

आज जागतिक आरोग्यासाठी अधिक सर्वसमावेशक आणि शाश्वत दृष्टीकोन यांची आवश्यकता आहे. यासाठी एकत्रितपणे योगदान देणे, तसेच जागतिक आरोग्य व्यवस्थेच्या विविध पैलूंवर अर्थपूर्ण चर्चा करणे आवश्यक आहे.

गोवा : मोरजी आणि मांद्रे समुद्रकिनार्‍यांवर संगीत महोत्सव घेण्यास बंदी येणार

मोरजी ते मांद्रे ही समुद्रकिनारपट्टी कासव संवर्धन केंद्र म्हणून घोषित केल्यामुळे या क्षेत्रात यापुढे संगीत महोत्सव आयोजित करण्यास मनाई केली जाणार आहे, अशी माहिती राज्याचे ॲडव्होकेट जनरल देवीदास पांगम यांनी दिली आहे.