उत्तरप्रदेशात कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती उत्तम ! – मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ

नवी देहली – उत्तरप्रदेशात आता दंगली होत नाहीत. उत्तरप्रदेशात कायद्याचे राज्य आहे. आता कोणताही गुन्हेगार किंवा माफिया कोणत्याही उद्योजकाला धमकावत नाही, उत्तरप्रदेश सरकार तुम्हाला कायदा आणि सुव्यस्था उत्तमरित्या देण्याची निश्‍चिती देतो, असे राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी म्हटले आहे. कुख्यात गुंड अतिक आणि अश्रफ अहमद यांच्या हत्येनंतर उत्तरप्रदेशमधील कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले जात असतांना मुख्यमंत्री योगी यांनी हे विधान केले आहे.

मुख्यमंत्री योगी अदित्यनाथ म्हणाले की, जे माफिया आधी राज्यासाठी संकट होते, आता ते स्वतः संकटात आहेत. आमच्या काळात उत्तरप्रदेशात एकदाही संचारबंदी लागलेली नाही. कोणत्याही रस्त्यावरून जायला आता भीती वाटत नाही. उत्तरप्रदेश आता विकासासाठी ओळखला जातो. पूर्वी उत्तरप्रदेशमधील कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती दयनीय होती.