पोलीस कोठडीत रचण्यात आला पती आणि दीर यांच्या हत्येचा कट !

उमेश पाल यांच्या हत्येच्या ३ दिवसांनंतर म्हणजे २७ फेब्रुवारीला लिहिलेल्या या पत्रात शाईस्ता हिने एका मंत्र्याने हत्येचा कट रचला होता आणि पोलीस अधिकार्‍यांनी हत्येचे ठेका घेतल्याचे म्हटले होते.

छिंदवाडा (मध्यप्रदेश) येथील महंत कनक बिहारीदास महाराज यांचे अपघातात निधन

मध्यप्रदेशातील छिंदवाडास्थित आश्रमाचे महंत कनक बिहारीदास महाराज यांचा १७ एप्रिल या दिवशी नरसिंहपूर जिल्ह्यातील बर्मन-सागरी राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात मृत्यू झाला.

जम्मू-काश्मीरमधील हिंदूंना अल्पसंख्यांकांचा दर्जा देण्यास आमचा आक्षेप नाही ! – राष्ट्रीय अल्पसंख्यांक आयोग

जम्मू-काश्मीरमधील काश्मिरी हिंदूंना केंद्रशासन जर अल्पसंख्यांकांचा दर्जा देत असेल, तर राष्ट्रीय अल्पसंख्यांक आयोगाला त्यावर कोणताही आक्षेप नाही, असे मत या आयोगाच्या सदस्या सईद शहजादी यांनी व्यक्त केले आहे.  

कर्नाल (हरियाणा) येथे ‘राईस मिल’ची इमारत कोसळून ४ कामगारांचा मृत्यू

येथे ‘शिवशक्ती राईस मिल’ची इमारत कोसळून त्यात २० ते २५ कामगार गाडले गेले आहेत. आतापर्यंत ४ कामगारांचा मृत्यू झाला आहे.

पाटलीपुत्र (बिहार) येथे वाळू माफियांकडून सरकारी अधिकार्‍यांवर आक्रमण !

बिहारची पुन्हा एकदा जंगलराजच्या दिशेने वाटचाल चालू असल्याचे हे निर्देशक आहे ! ही स्थिती तेथील सरकार आणि पोलीस यांना लज्जास्पद !

सुदानची राजधानी खार्टूम येथून ५० लाख नागरिकांचे पलायन !

सैन्य दल आणि निमलष्करी दल यांच्यात चालू असलेल्या संघर्षामुळे आतापर्यंत १८० जणांचा मृत्यू झाला आहे, तर १ सहस्र ८०० लोक घायाळ झाले आहेत.

अमेरिकेत ‘गुप्त पोलीस ठाणे’ उभारणार्‍या चिनी नागरिकांना अटक

या दोघांना ‘आपली चौकशी होणार’, असे लक्षात येताच त्यांनी पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला, अशी माहितीही पोलीस अधिकार्‍यांनी दिली.

अमरनाथ यात्रेच्या नोंदणीला प्रारंभ

अमरनाथ यात्रेसाठी १७ एप्रिलपासून नोंदणीस प्रारंभ झाला आहे. १३ ते ७० या वयोगटातील लोक नोंदणी करू शकतात.

लंडन येथील भारतीय उच्चायुक्तालयावरील आक्रमणाची एन्.आय.ए. करणार चौकशी

भारतीय उच्चायुक्तालयावर खलिस्तान्यांकडून काही आठवड्यांपूर्वी झालेल्या आक्रमणाची राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेकडून (एन्.आय.ए.कडून) चौकशी करण्यात येणार आहे.

बांगलादेशाची विचार स्वातंत्र्याविषयीची भूमिका भयावह ! – तस्लिमा नसरीन

एका महाविद्यालयाच्या प्राचार्या सेलिना अख्तर यांनी ‘रमझान हा शब्द मला रामाची आठवण करून देतो’, असे म्हटल्याने त्यांचे निलंबन करण्यात आले.