इस्लामवरील टीकाकार गीर्ट विल्डर्स यांना ठार मारा !

पाकच्या राजकारण्याकडून डच मुसलमानांना चिथावणी !

पाकिस्तानातील मुफ्ती डॉ. महंमद अश्रफ असिफ जलाली

अ‍ॅमस्टरडॅम (नेदरलँडस) – ‘पाकिस्तानातील मुफ्ती डॉ. महंमद अश्रफ असिफ जलाली याने मला ठार मारण्याचा फतवा पुन्हा एकदा काढला आहे. त्याने या व्हिडिओद्वारे डच मुसलमानांना मला ठार करण्याची चिथावणी दिली आहे. हे भयावह होत चालल्याने प्रसारमाध्यमांनी त्यांचे कार्य अत्यंत चोखपणे करणे आवश्यक आहे’, असे ट्वीट नेदरलँडस येथील ‘पार्टी फॉर फ्रीडम’ या राजकीय पक्षाचे संस्थापक आणि खासदार गीर्ट विल्डर्स यांनी केले आहे. या ट्वीटसमवेत डॉ. जलाली यांच्या वक्तव्याचा व्हिडिओही विल्डर्स यांनी जोडला आहे. गिल्डर्स हे इस्लाम, त्याची तत्त्वे आणि जिहादी आतंकवाद यांचे कठोर शब्दांत खंडण करतात.

डॉ. महंमद अश्रफ असिफ जलाली हे पाकिस्तानातील ‘तहरीक लब्बैक या रसूल अल्लाह’ या कट्टर इस्लामीवादी राजकीय पक्षाचे अध्यक्ष आहेत. त्यांच्या वरील व्हिडिओला अनेक पाकिस्तानी मुसलमानांनी पाठिंबा दर्शवला आहे.

संपादकीय भूमिका

यावरून ‘पाकिस्तान हाच जगभरातील जिहादी आतंकवादाचा मुख्य स्रोत आहे’, हे पुन्हा एकदा सिद्ध होते !