कोल्हापूर जिल्ह्यातील १ सहस्र ग्रामपंचायतींना विकासासाठी ४८ कोटी रुपयांचा निधी वर्ग !

 

कोल्हापूर – जिल्ह्यातील १ सहस्र १५ ग्रामपंचायतींना गेल्या आर्थिक वर्षातील १५ व्या वित्त आयोगातील निधीचा दुसरा हप्ता ४७ कोटी ७२ लाख १० सहस्र रुपये ग्रामपंचायतीच्या खात्यावर वर्ग करण्यात आला आहे. या निधीतील स्वच्छता, स्थानिक स्वराज्य संस्थांची देखभाल-दुरुस्ती, पेयजल योजना, रेन वॉटर हार्वेस्टिंग, वॉटर रिसायकलिंग यांसाठी ५० टक्के निधी वापरणे बंधनकारक आहे. यात करवीर तालुक्याला ८ कोटी १८ लाख रुपयांचा निधी देण्यात आला आहे. राज्यातील २६ जिल्हा परिषद, २८९ पंचायत समित्या आणि ६३५ ग्रामपंचायतींवर प्रशासक असल्याने या स्थानिक स्वराज्य संस्थांना त्यांचा वाटा यातून देण्यात आलेला नाही.