पुणे – येथे शहरात आणि परिसरात राजरोसपणे नागरिकांचा जिव धोक्यात घालून अवैधरित्या चालणार्या रिक्शा वाहतुकीला पुणे शहर वाहतूक पोलीस जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत. क्षमतेपेक्षा अधिक नागरिक घेऊन हे रिक्क्षाचालक वाहतूक करतात; परंतु समोर वाहतूक विभागाचे पोलीस असूनही कोणतीही कारवाई करत नाहीत. या विभागातील पोलीस अधिकारी फक्त दुचाकी स्वारांवर आणि चारचाकी वाहनांवर हप्ता वसूल करण्यासाठी कारवाई करतात. यामुळे रिक्शाचालक निर्भीडपणे अवैध वाहतूक करतांना दिसत आहेत, असे या परिसरातील नागरिकांचे म्हणणे आहे. बर्याच वेळा नागरिकांनी याविषयी तक्रारी केल्या; परंतु कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही.
अवैध प्रवासी वाहतूक करणार्या रिक्शाचालकांवर कारवाई चालूच असल्याचे वाहतूक पोलिसांकडून सांगण्यात येते; परंतु प्रत्यक्षात मात्र परिस्थिती वेगळी आहे. हांडेवाडी, कोंढवा, स्वारगेट, बंडगार्डन, वानवडी या परिसरातील अवैध रिक्शा वाहतुकीस वाहतूक विभागांचे अभय असल्याचे दिसून येते.
संपादकीय भूमिकाराजरोसपणे चालू असलेल्या अवैध रिक्शा वाहतुकीवर कारवाई का केली जात नाही ? अशा प्रकारे अवैध वाहतूक चालू ठेवणार्यांनाही कठोर शिक्षा होणे आवश्यक ! |