श्री छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखाना हा शेतकरी सभासदांचाच राहील ! – अमल महाडिक, माजी आमदार, भाजप

श्री अमल महाडिक

कोल्हापूर – श्री छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या संदर्भात काँग्रेसचे आमदार सतेज पाटील हे निरर्थक आरोप करत आहेत. हा कारखाना गेली २८ वर्षे आम्ही लोकशाही पद्धतीने चालवत आहे. सर्व आर्थिक बाजू सांभाळून कारखाना शेतकरी सभासदांना २ सहस्र ९०० रुपये प्रतिटन दर देत आहे. आमदार सतेज पाटील यांनी ‘महाडिक घाबरले आहेत. त्यामुळे आमचे २९ उमेदवार अपात्र होण्यासाठी ते प्रयत्न करत आहेत’, अशी टीका करत केली अाहे; श्री छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखाना हा शेतकरी सभासदांचा आहे आणि तो सभासदांचाच राहिल, असे प्रतिपादन सत्तारूढ गटाचे नेते आणि भाजपचे माजी आमदार अमल महाडिक यांनी पत्रकार परिषदेत केले.

कारखाना निवडणुकीच्या संदर्भातील अन्य घडामोडी

१. श्री छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखाना निवडणुकीसाठी राजर्षी छत्रपी शाहू परिवर्तन आघाडीच्या २९ अवैध ठरलेल्या उमेदवारांनी प्रादेशिक सहसंचालक (साखर) यांच्याकडे प्रविष्ट केलेले अपील नामंजूर करण्यात आले आहे. याविरोधात राजर्षी छत्रपती शाहू परिवर्तन आघाडी न्यायालयात दाद मागणार असल्याचे कळते.

२. या कारखान्यासाठी १२ एप्रिल हा आवेदन मागे घेण्यासाठीचा अखेरचा दिवस असून २३ एप्रिलला मतदान होणार आहे.