
कोल्हापूर, १२ एप्रिल (वार्ता.) – राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आयोध्येतील बाबरी मशीद पाडण्यात शिवसेनेचा काही संबंध नव्हता, असे वक्तव्य केले होते. या वक्तव्याचा निषेध करून मंत्री चंद्रकांत पाटील यांनी त्यागपत्र द्यावे, या मागणीसाठी उद्धव ठाकरे गटाने १२ एप्रिलला छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चौक येथे निदर्शने केली. या वेळी जिल्हाप्रमुख विजय देवणे, शहरप्रमुख रविकिरण इंगवले, शहरप्रमुख सुनील मोदी, करवीर तालुकाप्रमुख राजू यादव, उपशहरप्रमुख शशी बिडकर, युवासेनेचे मंजित माने यांसह अन्य पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
ऐरोली बसस्थानकात मोठ्या पावसानंतर खड्डे
टाकळी (सांगली) येथे वाढीव वर्गणी देऊनही भेडसावणार्या तीव्र पाणीटंचाईमुळे नागरिक त्रस्त !
कुडाळ येथील शासकीय भूमीतील अनधिकृत ‘फास्ट फूड स्टॉल’ अखेर हटवला
पुणे शहरातील रस्त्यांवर केवळ ५४ खड्डेच !
उसप गावातील प्रस्तावित दगड खाण आणि क्रशर प्रकल्पाला ग्रामस्थांचा विरोध
पत्नीचा छळ करून तिची आक्षेपार्ह छायाचित्रे प्रसारित करण्याची धमकी