नेदरलँड्सचे खासदार विल्डर्स यांना ठार मारण्याचा फतवा !

पाकिस्तानच्या ‘तहरीक लब्बैक या रसूल अल्ला’ या कट्टर इस्लामी राजकीय पक्षाच्या संस्थापकाने जारी केला फतवा !

नेदरलँड्सचे खासदार विल्डर्स

अ‍ॅमस्टरडॅम (नेदरलँड्स) – आमचा फतवा अंतिम आहे, अशा प्रकारे ज्या मुसलमानाने माझ्याविरोधात फतवा जारी केला आहे, त्याने मला ठार मारण्यासाठी मुसलमानांना आवाहन केले आहे. हे कृत्य करण्यात कुणा मुसलमानाने अपराधीभाव आणू नये, असे त्याचे म्हणणे आहे. हा भयावह आतंकवाद आहे, असे ट्वीट नेदरलँड्स येथील ‘पार्टी फॉर फ्रीडम’ या राजकीय पक्षाचे संस्थापक आणि कट्टरतावादी मुसलमानांचे खरे स्वरूप जगासमोर आणणारे खासदार गीर्ट विल्डर्स यांनी केले आहे.

विल्डर्स यांनी ट्वीटसमवेत डॉ. महंमद अश्रफ आसिफ जलाली या धमकी देणार्‍या मुसलमानाच्या ट्वीटचा ‘स्क्रीनशॉट’ जोडला आहे, ज्यात डॉ. महंमद याने विल्डर्स यांना उद्देशून म्हटले आहे, ‘विल्डर्स यांना ठार करतांना ते किती ओरडतात, याच्याशी माझे देणे-घेणे नाही. आम्ही त्याच्यामुळे जागतिक शांतता नष्ट होऊ देणार नाही !’ फतवा जारी केलेला डॉ. महंमद अश्रफ आसिफ जलाली हा पाकिस्तानच्या ‘तहरीक लब्बैक या रसूल अल्ला’ या कट्टर इस्लामी राजकीय पक्षाचा संस्थापक आहे.