(म्हणे) ‘बांगलादेशी मुसलमान देहलीवर इस्लामचा ध्वज फडकावतील !’ – बांगलादेशी मौलानाला पडले दिवास्वप्न !

(मौलाना म्हणजे इस्लामी अभ्यासक)

बांगलादेशी मौलाना इनायतुल्ला अब्बासी

ढाका (बांगलादेश) – येणार्‍या काळात बांगलादेशी मुसलमान देहलीवर इस्लामचा ध्वज फडकावतील. जर कुणी बांगलादेशवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला, तर प्रत्येक मदरशाला शस्त्रास्त्रांनी युक्त करण्यात येऊन त्यांना छावणीचे रूप दिले जाईल. प्रत्येक मुसलमान जिहादसाठी बांगलादेशी सैन्यासमवेत उभा राहील, असे फुकाचे वक्तव्य बांगलादेशमधील मौलाना इनायतुल्ला अब्बासी याने केले आहे. त्यांचा व्हिडिओ ‘पाकिस्तान अनटोल्ड’ या ट्विटर खात्यावरून ट्वीट करण्यात आला आहे.

‘व्हॉईस ऑफ बांगलादेशी हिंदूज’ या ट्विटर खात्यानुसार अब्बासी हा एक बांगलादेशी विद्वान असून तो नेहमीच भारताच्या विरोधात गरळओक करत असतो.

संपादकीय भूमिका

अशा धर्मांध मुसलमानांवर कारवाई होण्यासाठी केंद्रशासनाने बांगलादेशच्या शेख हसीना सरकारला बाध्य केले पाहिजे !