यशवंतगडानजीकचे अवैध उत्खनन आणि बांधकाम यांच्या विरोधातील उपोषण ८ दिवसांच्या उपोषणानंतर प्रशासनाच्या आश्वासनामुळे शिवप्रेमींचे आंदोलन स्थगित

आम्ही करत असलेले आंदोलन वैयक्तिक नसून महाराष्ट्राचे दैवत असलेल्या शिवछत्रपतींच्या गडांविषयी आहे. छत्रपतींच्या गडांच्या एका दगडालाही कुणी हात लावू नये, असे कडक कायदे करावेत, अशी आमची शासनाला विनंती आहे.

मुख्यमंत्री डॉ. सावंत यांची अंदमान येथील ‘सेल्युलर जेल’ला भेट देऊन स्वातंत्र्यवीर सावरकर यांना आदरांजली

ज्या कोठडीत स्वातंत्र्यवीर सावरकर यांना ठेवण्यात आले होते आणि त्यांनी सश्रम कारावास भोगला होता, तेथे भेट देऊन प्रार्थना करण्याचा मला सन्मान वाटतो.

हिंदु राष्ट्र-जागृती सभेच्या प्रचारासाठी वायंगणी, आचरा येथे निघाली भव्य वाहनफेरी

‘हर हर महादेव’, ‘जयतु जयतु हिंदुराष्ट्रम्’, ‘एकच लक्ष्य, एकच ध्येय, हिंदु राष्ट्र-हिंदु राष्ट्र’ अशा गगनभेदी घोषणांनी तालुक्यातील आचरा, वायंगणी परीसर दुमदुमून गेला.

गोव्यात शिगमोत्सवाला ८ मार्चपासून फोंड्यातून प्रारंभ होणार !

पर्यटन खात्याने शिगमोत्सव समित्यांसमवेत संयुक्त बैठक घेतली. सर्वांशी चर्चा करून दिनांक ठरवण्यात आले आहेत. ८ मार्चला फोंड्याहून शिगमोत्सवाला प्रारंभ होईल.

मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी घाटातील बोगद्याचे काम ऑक्टोबरपर्यंत पूर्ण होणार

कोकणातील मुंबई – गोवा या राष्ट्रीय महामार्गावरील कशेडी घाटातील बोगद्याचे काम ऑक्टोबर २०२३ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. या पावसाळ्याच्या आरंभीच म्हणजे जूनमध्ये या बोगद्यातून एक लेन वाहतुकीसाठी खुली केली जाणार आहे.

तोतया पोलिसांचा टोळीने रत्नागिरी आणि चिपळूण येथील २ वृद्धांना लुटले

पोलीस असल्याचे खोटे सांगून रत्नागिरी आणि चिपळूण येथे २ वृद्धांना लुटल्याच्या घटना ! याप्रकरणी रत्नागिरीत ३ जणांच्या, तर चिपळुणात २ जणांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या चोरांनी वृद्धांच्या अंगावरील दागिने लुटले.

हे शासनकर्त्यांना कळत कसे नाही ?

‘भारतात उपलब्ध असलेली जमीन, धान्य आणि पाणी यांचा विचार करून भारताची लोकसंख्या किती होऊ द्यायची, यांचा विचार करा, नाहीतर पुढे होणार्‍या गर्दीत सर्वजण गुदमरतील ! हे शासनकर्त्यांना कळत कसे नाही ?’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

हिंदूंनी ‘लव्‍ह जिहाद’ आणि धर्मांतर थांबवण्‍यासाठी संघटित झाले पाहिजे ! – ह.भ.प. वेदांतरत्न डॉ. रामकृष्‍ण महाराज अमरावतीकर

लडी लेआऊट, वानाडोंगरी येथील जागृत नाग मंदिर समितीच्‍या वतीने आयोजित ‘श्रीमद़् शिव महापुराण कथा ज्ञानयज्ञ सप्‍ताहा’त ते बोलत होते. ज्ञानयज्ञ सप्‍ताहाच्‍या ठिकाणी सनातन संस्‍थेच्‍या वतीने फ्‍लेक्‍स प्रदर्शन लावण्‍यात आले होते.

माण तालुक्‍यात ३.६ रिक्‍टर स्‍केलचा भूकंप !

भूकंपाचा केंद्रबिंदू माणपासून ५ किलोमीटर अंतरावर होता. या भूकंपामुळे कोणतीही जीवित अथवा वित्त हानी झालेली नाही. भूकंपाची तीव्रता अल्‍प असल्‍यामुळे तो काही ठिकाणी जाणवलाही नाही.

महाराष्‍ट्रात तात्‍काळ धर्मांतरबंदी कायदा करा ! – सुनील घनवट, महाराष्‍ट्र आणि छत्तीसगड राज्‍य संघटक, हिंदु जनजागृती समिती

हिंदूंच्‍या राष्‍ट्रकार्याला होणारा विरोध करण्‍याचे धैर्य समाजकंटकांना होणे, हे हिंदुत्‍वनिष्‍ठ शासनाच्‍या काळात अपेक्षित नाही !