हिंदूंनी ‘लव्‍ह जिहाद’ आणि धर्मांतर थांबवण्‍यासाठी संघटित झाले पाहिजे ! – ह.भ.प. वेदांतरत्न डॉ. रामकृष्‍ण महाराज अमरावतीकर

नागपूर – सध्‍याच्‍या काळात हिंदूंंसमोर ‘लव्‍ह जिहाद’ आणि धर्मांतर या मोठ्या समस्‍या उभ्‍या आहेत. त्‍याची भीषणता लक्षात घेऊन हिंदूंनी जागृत झाले पाहिजे, तसेच संघटित होऊन या समस्‍या थांबवल्‍या पाहिजेत, असे मार्गदर्शन अमरावती येथील ह.भ.प. वेदांतरत्न डॉ. रामकृष्‍ण महाराज अमरावतीकर यांनी केले. लडी लेआऊट, वानाडोंगरी येथील जागृत नाग मंदिर समितीच्‍या वतीने आयोजित ‘श्रीमद़् शिव महापुराण कथा ज्ञानयज्ञ सप्‍ताहा’त ते बोलत होते. ज्ञानयज्ञ सप्‍ताहाच्‍या ठिकाणी सनातन संस्‍थेच्‍या वतीने फ्‍लेक्‍स प्रदर्शन लावण्‍यात आले होते.

सनातन संस्‍थेच्‍या साधकांनी ह.भ.प. वेदांतरत्न डॉ. अमरावतीकर यांची घेतली भेट !

या वेळी सनातन संस्‍थेचे साधक सर्वश्री मारुति लेनगुळे आणि शंकर बारई यांनी ह.भ.प. वेदांतरत्न डॉ. अमरावतीकर यांची भेट घेतली, तसेच त्‍यांना दैनिक ‘सनातन प्रभात’चा अंक भेट दिला. या वेळी ते म्‍हणाले, ‘‘मी सनातन संस्‍थेच्‍या कार्याशी परिचित आहे. संस्‍थेचे कार्य अतिशय चांगले आहे. माझ्‍याकडे तुमचे ग्रंथ आहेत.’’