पाकमध्ये हिंदु विवाहित तरुणीचे मुसलमान पोलीस कर्मचार्‍याकडून अपहरण आणि विवाह !

पाकमध्ये पोलीस कर्मचारी ओबेदुल्ला खोसो याने विवाहित हिंदु तरुणी लाली कच्छी हिला बलपूर्वक पळवून नेले आणि तिच्याशी विवाह केला.

मेक्सिकोमधील कारागृहावरील आक्रमणात १४ जण ठार

उत्तर अमेरिका खंडातील मेक्सिको देशातील  सिओडाड जुआरेजमधील एका कारागृहावर अज्ञातांनी केलेल्या आक्रमणात १० सुरक्षारक्षक आणि ४ बंदीवान ठार झाले. या आक्रमणामुळे २४ बंदीवान कारागृहातून पळून गेले. 

विजयवाडा येथे अय्यप्पा स्वामींच्या भजनात ख्रिस्ती शेजार्‍यांकडून व्यत्यय !

आंध्रप्रदेशात ख्रिस्ती मुख्यमंत्री असल्यानेच धर्मांध ख्रिस्त्यांचे फावले असून ते हिंदूंवर कुरघोडी करू धजावतात ! हिंदूंनीही संघटित होऊन वैध मार्गाने अशांना जाब विचारायला हवा !

‘ऑप इंडिया’ वृत्तसंकेतस्थळानुसार वर्षभरात ‘लव्ह जिहाद’च्या १५३ घटना !

देशात वर्ष २०२२ मध्ये ‘लव्ह जिहाद’च्या १५३ घटनांचे वार्तांकन ‘ऑप इंडिया’ या वृत्तसंकेतस्थळाने केले होते. लव्ह जिहादच्या घटना याहून अधिक असण्याची शक्यता आहे; कारण काही घटना समाजासमोर, पोलिसांसमोर येऊ शकलेल्या नाहीत. या घटनांमध्ये हिंदु मुली, तरुणी, महिला आणि तरुण बळी पडलेले आहेत.

वासरावर बलात्कार करणार्‍या इम्तियाज याला कर्नाटकमध्ये अटक

कर्नाटकातील रायचूर जिल्ह्यात गायीच्या वासरावर बलात्कार केल्याच्या प्रकरणी इम्तियाज हुसेन मियाँ (वय २४ वर्षे ) याला पोलिसांनी नुकतीच अटक केली. वासराला मशिदीजवळील शेतातील एका झाडाला बांधून त्याच्यावर बलात्कार करतांना इम्तियाज याला पकडण्यात आले होते, असे पोलिसांनी सांगितले.

शंखवाळ (सांकवाळ) येथे पुरातन श्री विजयादुर्गादेवीच्या मंदिराची भूमी बळकावण्याचा चर्चसंस्थेचा कुटील डाव !

चर्चसंस्थेने गेल्या अनेक वर्षांपासून पुरातत्व खात्याच्या संगनमताने सुनियोजितपणे पुरातन मंदिराची ही भूमी बळकावण्यास प्रारंभ केला आहे.

दक्षिण गोव्यात १ वर्षात बलात्काराची ३५ प्रकरणे नोंद

महिलांनी स्वसंरक्षण प्रशिक्षण घेणे आवश्यक आहे, तसेच बलात्कार्‍यांना फाशीची शिक्षा झाल्यासच असे प्रकार थांबतील !

म्हादई जलवाटप तंटा

म्हादई नदीचे पाणी कळसा आणि भंडुरा येथे उभारण्यात येणार्‍या धरणांच्या माध्यमातून मलप्रभा नदीत वळवण्यासाठी केंद्रीय जल आयोगाने कर्नाटक सरकारला संमती दिल्याने गोव्यात तीव्र असंतोष उमटला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस आणि पवार यांना ‘धर्मवीर’ कधीच कळणार नाहीत ! – नितेश राणे, आमदार, भाजप

विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी त्यांच्या पदाचे त्यागपत्र द्यावे, अशी मागणी भाजपचे आमदार नितेश राणे यांनी ट्वीटद्वारे केली आहे.

गोव्याच्या हितरक्षणासाठी गोमंतकियांनी संघटित होऊन आवाज उठवावा ! – पर्यावरणतज्ञ राजेंद्र केरकर

नेत्यांनी राजकारण करण्याऐवजी प्रामाणिकपणे राज्याच्या हिताचे रक्षण कसे होईल, यासाठी संघटित प्रयत्न केले पाहिजेत, तरच कर्नाटककडून होणारा जल आणि जंगल यांचा र्‍हास रोखणे शक्य होणार आहे.