पाकमध्ये हिंदु विवाहित तरुणीचे मुसलमान पोलीस कर्मचार्‍याकडून अपहरण आणि विवाह !

तरुणीला सोडवण्यासाठी गेलेल्या तिच्या भावाचा आक्रमणात मृत्यू

(प्रतिकात्मक चित्र)

कराची (पाकिस्तान) – पाकमध्ये पोलीस कर्मचारी ओबेदुल्ला खोसो याने विवाहित हिंदु तरुणी लाली कच्छी हिला बलपूर्वक पळवून नेले आणि तिच्याशी विवाह केला. या प्रकरणी लाली हिच्या भावाने पोलिसांत तक्रार केल्यानंतर लाली हिची खोसोच्या कह्यातून सुटका करण्यात आली. न्यायालयाने लाली हिला लाला कच्छी या तिच्या भावाच्या नियंत्रणात देण्याचा आदेश दिला.

यानंतर ओबेदुल्ला याने लाली हिचे पुन्हा अपहरण केले. या वेळी लाला कच्छी याने तिला सोडवण्याचा प्रयत्न केला. त्या वेळी त्याच्यावर झालेल्या आक्रमणात लाला कच्छी याचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती ‘हिंदूज ऑर्गनायझेशन ऑफ सिंध’ या संघटनेचे संस्थापक आणि संयोजक नारायण दास भिल यांनी ट्वीट करून  दिली.

संपादकीय भूमिका 

पाकमधील असुरक्षित हिंदू !