विजयवाडा येथे अय्यप्पा स्वामींच्या भजनात ख्रिस्ती शेजार्‍यांकडून व्यत्यय !

अमरावती – आंध्रप्रदेशात ख्रिस्ती मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली हिंदूंचा छळ होत असल्याचे विजयवाडा येथील अय्यप्पा स्वामींच्या भक्ताच्या एका ‘व्हिडिओ’वरून पुन्हा एकदा समोर आले आहे. अय्यप्पा यात्रेसाठी अय्यप्पा स्वामींची दीक्षा घेतलेल्या या भक्ताने व्रताचा एक भाग म्हणून त्याच्या घरी भजनाचा कार्यक्रम आयोजित केला होता.

व्हिडिओमध्ये तो म्हणत आहे की, त्याच्या घरी भजनाचा कार्यक्रम आयोजित केल्याची कल्पना त्याने ख्रिस्ती शेजार्‍यांना दिली आणि त्या वेळेत त्यांनी (ख्रिस्त्यांनी) मोठ्याने प्रार्थना न करण्याची विनंती केली होती. एवढे आदरपूर्वक सांगूनही ख्रिस्ती शेजार्‍यांनी भजनाच्या वेळी मोठ्या आवाजात प्रार्थना चालू ठेवून अय्यप्पा स्वामींच्या भजनात व्यत्यय आणला.

अय्यप्पा स्वामींच्या भक्ताने संयम राखत ख्रिस्त्यांना आवाज अल्प करण्याची विनंती केली; पण त्याकडे त्यांनी दुर्लक्ष केले आणि मोठ्या आवाजात गाणी वाजवणे चालू ठेवले. ‘ख्रिस्ती लोक प्रार्थना सभेच्या नावाखाली ध्वनीप्रदूषण करतात. ख्रिस्तेतर लोकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी ते मोठ्याने प्रार्थना करण्याची युक्ती वापरतात आणि त्या माध्यमातून त्यांचा मानसिक छळ करतात. अशा लोकांवर पर्यावरण दूषित केल्याच्या प्रकरणी गुन्हा नोंदवावा’, अशी मागणी हिंदु भक्तांनी केली आहे.

संपादकीय भूमिका 

आंध्रप्रदेशात ख्रिस्ती मुख्यमंत्री असल्यानेच धर्मांध ख्रिस्त्यांचे फावले असून ते हिंदूंवर कुरघोडी करू धजावतात ! हिंदूंनीही संघटित होऊन वैध मार्गाने अशांना जाब विचारायला हवा !