‘ऑप इंडिया’ वृत्तसंकेतस्थळानुसार वर्षभरात ‘लव्ह जिहाद’च्या १५३ घटना !

९९ प्रकरणांमध्ये मुसलमान युवकांनी ते हिंदु असल्याचे सांगितले !

नवी देहली – देशात वर्ष २०२२ मध्ये ‘लव्ह जिहाद’च्या १५३ घटनांचे वार्तांकन ‘ऑप इंडिया’ या वृत्तसंकेतस्थळाने केले होते. लव्ह जिहादच्या घटना याहून अधिक असण्याची शक्यता आहे; कारण काही घटना समाजासमोर, पोलिसांसमोर येऊ शकलेल्या नाहीत. या घटनांमध्ये हिंदु मुली, तरुणी, महिला आणि तरुण बळी पडलेले आहेत.

१. वेगवेगळ्या राज्यांचा विचार केला, तर उत्तरप्रदेमध्ये ६५, मध्यप्रदेशात ३७, झारखंडमध्ये १२, उत्तराखंड आणि गुजरात येथे प्रत्येकी ७, देहली अन् कर्नाटक येथे प्रत्येकी ५, महाराष्ट्रात ४; बिहारमध्ये ३, हरियाणा, राजस्थान आणि केरळ येथे प्रत्येकी २, तर आसाममध्ये १ प्रकरण समोर आले आहे.

२. मासांप्रमाणे विचार केल्यास जानेवारी ११, फेब्रुवारी ४, मार्च १२, एप्रिल ८, मे मासात १०, जून ११, जुलै १७, ऑगस्ट ११, सप्टेंबर १४ ऑक्टोबर ७, नोव्हेंबर २३, तर डिसेंबर मासात २५ घटना समोर आल्या.

३. १५३ प्रकरणांपैकी ९९ प्रकरणांमध्ये मुसलमान युवकांनी त्यांचा धर्म लपवून ते हिंदु असल्याचे सांगितले होते, तर ६ प्रकरणांत त्यांनी ते विवाहित असल्याची माहिती लपवली होती. हिंदु असल्याचे सांगतांना या तरुणांनी हिंदु नाव ठेवणे, मनगटावर लाल दोरा बांधणे, आदी गोष्टी केल्या होत्या.

४. २१ प्रकरणांमध्ये प्रेमाच्या जाळ्यात फसलेल्या हिंदु तरुणींशी शारीरिक संबंध ठेवतांनाची छायाचित्रे, व्हिडिओ बनवून त्याद्वारे त्या तरुणींना नंतर धमकावण्यात आले होते.

५. २२ प्रकरणांत हिंदु तरुणींकडून देवतांच्या मूर्ती तोडण्यास, गोमांस खाण्यास, बुरखा घालण्यास, मित्रांसमवेत शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडण्यात आले होते.
३ प्रकरणांत तरुणींच्या नातेवाइकांना शिरच्छेद करण्याची धमकी देण्यात आली होती.

६. २८ प्रकरणांतील तरुणींचे वय १८ वर्षांहून अल्प होते. याचाच अर्थ मुसलमान तरुण अल्पवयीन हिंदु मुलींना जाळ्यात अडकवत होते.

७. वर्षभरातील प्रकरणांचा अभ्यास करता ७ प्रकरणांमध्ये मुसलमान तरुणांनी दलित हिंदु तरुणींना जाळ्यात ओढले होते.