नागपूर खंडपिठाची फेसबुकला नोटीस !

बंदी असलेल्‍या नायलॉन मांजाची विक्री केल्‍याप्रकरणी ‘फेसबुक इंडिया ऑनलाईन सर्व्‍हिस प्रा. लि.’ला मुंबई उच्‍च न्‍यायालयाच्‍या नागपूर खंडपिठाने ६ जानेवारी या दिवशी नोटीस बजावली आहे, तसेच ११ जानेवारीपर्यंत उत्तर देण्‍याचा आदेशही दिला आहे.

मेक्सिकोमध्ये चकमकीत १९ तस्कर आणि १० सैनिक ठार

अमली पदार्थ माफिया आणि सैनिक यांच्यात झालेल्या चकमकीमध्ये १० सैनिक आणि १९ अमली पदार्थ तस्कर ठार झाले. अमली पदार्थ तस्करांनी जाळपोळ केली आणि रस्ते बंद केले.

महिला कर्मचार्‍यांना हिजाब घालण्यास ‘ब्रिटीश एअरवेज’ची अनुमती !

‘आधुनिक’ म्हणवून घेणार्‍या ब्रिटनमधील हवाई आस्थापन धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली कसे मुसलमानधार्जिणे निर्णय घेत आहे, हेच यातून दिसून येते !

राष्‍ट्र आणि हिंदू विचार करणारे स्‍वातंत्र्यवीर सावरकर हे ‘भारतरत्न’ नव्‍हेत, तर खरे विश्‍वरत्न ! – शरद पोंक्षे, अभिनेते

छत्रपती शिवरायांना गुरुस्‍थानी मानून स्‍वातंत्र्यवीर सावरकरांनी युद्धनीती आणि राजकीय मुत्‍सद्देगिरी अवलंबली होती. काही अपवाद वगळता भारतरत्नांची यादी पाहिली, तर सावरकरांना ‘भारतरत्न’ नकोच. राष्‍ट्र आणि हिंदू यांचा विचार करणारे सावरकर हे खरे विश्‍वरत्न आहेत, असे परखड मत अभिनेता श्री. शरद पोंक्षे यांनी व्‍यक्‍त केले.

मुंबईत साखळी बाँबस्फोट होणार असल्याचा दावा करणारा पोलिसांच्या कह्यात !

येत्या २ मासांत मुंबईतील माहीम, भेंडीबाजार, नागपाडा, मदनपुरा आदी ठिकाणी वर्ष १९९३ प्रमाणे साखळी बाँबस्फोट होणार असल्याचा दावा करणार्‍याला पोलिसांनी कह्यात घेतले आहे.

हळदी-कुंकू लावणे, हा महाराष्ट्राच्या संस्कृतीचा भाग आहे ! – डॉ. कल्पना पांडे, महिला सत्राच्या संयोजिका

भारतीय संस्कृतीचे पालन करणार्‍या डॉ. कल्पना पांडे यांचे अभिनंदन ! त्यांची कृती इतरांसाठी आदर्श आणि प्रेरणादायी आहे. काँग्रेसींच्या विरोधाला न जुमानता हिंदु संस्कृतीचा आदर्श ठेवून महिलांच्या प्रत्येक कार्यक्रमात अशीच पद्धत राबवली पाहिजे !

पाकमध्ये गव्हाच्या पिठावरून झालेल्या हाणामारीत एकाचा मृत्यू !

भारतातील पाकप्रेमी भारताचे खाऊन पाकचे गुणगान करत आहेत. त्यांनी पाकच्या या स्थितीकडे लक्ष दिल्यास ते भारतात राहून किती सुखी आहेत, हे त्यांच्या लक्षात येईल !

बेंगळुरूतील शाळा बाँबने उडवण्‍याची धमकी देणारा विद्यार्थी कह्यात !

शाळेत मुलांना नीतीमत्ता आणि सुसंस्‍कार न शिकवल्‍याने मुले ‘गंमत’ म्‍हणून असे प्रकार करून समाज आणि व्‍यवस्‍था यांना वेठीस धरतात. असले प्रकार रोखण्‍यासाठी मुलांना साधना शिकवा !

पाकिस्‍तान कतारमधील द्रवीकृत नैसर्गिक वायूचे २ प्रकल्‍प विकणार !

आर्थिक दिवाळखोरीला पोचलेल्‍या पाकिस्‍तानने अमेरिकेतील त्‍याच्‍या दूतावासाची इमारत विक्रीला काढल्‍यानंतर आता कतार देशातील २ एल्.एन्.जी. (द्रवीकृत नैसर्गिक वायू) प्रकल्‍प विकण्‍याचा निर्णय घेतला आहे.