महिला कर्मचार्‍यांना हिजाब घालण्यास ‘ब्रिटीश एअरवेज’ची अनुमती !

(हिजाब म्हणजे मुसलमान महिलांनी डोके आणि मान झाकण्यासाठी वापरलेले वस्त्र)

ब्रिटीश एअरवेजमधील महिलांचा गणवेश

लंडन – ‘ब्रिटीश एअरवेज’ने कर्मचार्‍यांच्या गणवेशाविषयीच्या नियमांमध्ये पालट केले आहेत. ब्रिटीश एअरवेजने त्याच्या महिला कर्मचार्‍यांना हिजाब घालण्याची अनुमती दिली आहे. डिझायनर ओझवाल्ड बोटंंग यांनी महिला आणि पुरुष कर्मचार्‍यांसाठी कपडे सिद्ध केले आहेत. महिलांना ड्रेस, स्कर्ट किंवा ट्राउझर घालण्याची अनुमती असेल. ‘ब्रिटीश एअरवेज’च्या ३० सहस्र कर्मचार्‍यांना हा नियम लागू होणार आहे. ब्रिटीश एअरवेजचे अध्यक्ष सीन डॉयल म्हणाले, ‘‘आमचा गणवेश आमच्या आस्थापनाचे प्रतिनिधित्व करतो आणि भविष्यातही ‘आधुनिक ब्रिटन’साठी असेच करत राहू.’’

संपादकीय भूमिका

  • ‘आधुनिक’ म्हणवून घेणार्‍या ब्रिटनमधील हवाई आस्थापन धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली कसे मुसलमानधार्जिणे निर्णय घेत आहे, हेच यातून दिसून येते !
  • एकीकडे इराणी महिला हिजाबच्या विरोधात आंदोलन करत आहेत, तर दुसरीकडे सुधारणावादी देशाचे हवाई आस्थापन मध्ययुगात वावरत असल्याप्रमाणे निर्णय घेत आहेत. अशांना स्त्रीमुक्तीविषयी बोलण्याचा काय अधिकार?