
मुंबई – येत्या २ मासांत मुंबईतील माहीम, भेंडीबाजार, नागपाडा, मदनपुरा आदी ठिकाणी वर्ष १९९३ प्रमाणे साखळी बाँबस्फोट होणार असल्याचा दावा करणार्याला पोलिसांनी कह्यात घेतले आहे. ७ जानेवारी या दिवशी मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षात एका व्यक्तीने हा दूरभाष केला होता. दूरभाष करणार्याला मालाड येथून पोलिसांनी कह्यात घेतले असून त्याचे अन्वेषण चालू आहे.
‘बाँबस्फोट आणि दंगल घडवण्यासाठी अन्य राज्यांतून लोक आले आहेत. या बाँबस्फोटांमागे काँग्रेसच्या एका आमदाराचा हात आहे’, असेही या व्यक्तीने म्हटले होते. काही वर्षांपूर्वी देहली येथे घडलेल्या निर्भया बलात्काराच्या घटनेप्रमाणे (देहलीत एका तरुणीवर बलात्कार करून तिची हत्या केल्याच्या घटनेला ‘निर्भया घटना’ असे म्हणतात) मुंबईतही पुढील २ मासांत घटना घडणार असल्याचे त्याने सांगितले. हा दूरभाष आल्यावर आतंकवादविरोधी पथक, गुन्हे अन्वेषण यंत्रणा आदी अन्वेषण पथकाकडून दूरभाष करणार्याचा शोध घेण्यात आला. या सर्व पथकांकडून दूरभाष करणार्या व्यक्तीचे अन्वेषण चालू आहे.
म्हापसा येथील स्थानबद्धता केंद्रातून रशियाचा नागरिक पसार
आरोंदा येथे अवैधरित्या वास्तव्य करणार्या रशियाच्या नागरिकाला कारावास
आतंकवादी कसाबने कारागृहात मटण बिर्याणी मागितल्याचे वृत्त जाणीवपूर्वक पेरले होते ! – ज्येष्ठ विधीज्ञ पद्मश्री उज्ज्वल निकम
हिंदुत्वनिष्ठ हर्षा यांची हत्या करणार्या आरोपींनी कारागृह ‘वॉर्डन’वर केले आक्रमण !
‘नीट’च्या प्रश्नपत्रिका पोचवण्यासाठी अमरावतीत १५ वाहनांचा ताफा !
विशेष न्यायालयाने पोलीस उपअधीक्षकाचा जामीन फेटाळला !