मेक्सिकोमध्ये चकमकीत १९ तस्कर आणि १० सैनिक ठार

सैनिक

मेक्सिको सिटी (मेक्सिको) – मेक्सिकोतील अमली पदार्थ माफिया जोकिन एल् चापो गुजमॅन (वय ६२ वर्षे) हा जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे. त्याचा मुलगा ओविडियो याला अटक केल्यानंतर झालेल्या हिंसाचारात २९ जणांचा मृत्यू झाला. अमली पदार्थ माफिया आणि सैनिक यांच्यात झालेल्या चकमकीमध्ये १० सैनिक आणि १९ अमली पदार्थ तस्कर ठार झाले. अमली पदार्थ तस्करांनी जाळपोळ केली आणि रस्ते बंद केले. तसेच विमानतळावरही आक्रमण करण्याचा प्रयत्न केला. तेथे विमानांवर गोळीबार केला. त्या वेळी सैनिक आणि तस्कर यांच्यात चकमक उडाली.