पाकिस्‍तान कतारमधील द्रवीकृत नैसर्गिक वायूचे २ प्रकल्‍प विकणार !

द्रवीकृत नैसर्गिक वायू प्रकल्‍प

इस्‍लामाबाद (पाकिस्‍तान) – आर्थिक दिवाळखोरीला पोचलेल्‍या पाकिस्‍तानने अमेरिकेतील त्‍याच्‍या दूतावासाची इमारत विक्रीला काढल्‍यानंतर आता कतार देशातील २ एल्.एन्.जी. (द्रवीकृत नैसर्गिक वायू) प्रकल्‍प विकण्‍याचा निर्णय घेतला आहे. यातून पाकला १२ सहस्र ३४१ कोटी रुपये मिळणार आहेत. पाकिस्‍तानने चीन, सौदी अरेबिया, संयुक्‍त अरब अमिरात आणि कतार यांच्‍याकडून सर्वाधिक कर्ज घेतले आहे. हे कर्ज फेडण्‍यास तो सक्षम नसल्‍याने तो या देशांकडे कर्ज फेडण्‍यासाठी अधिक वेळ मागत आहे.